ड्रेनेज वाहिन्यांची स्वच्छता न राखल्याने ओव्हरफ्लो : दुर्गंधीचे साम्राज्य
प्रतिनिधी / बेळगाव
ड्रेनेजवाहिन्या तुडुंब भरण्याचे प्रकार घडत असून यामुळे स्मार्ट सिटीत अस्वच्छतेची बाब सातत्याने पुढे येत आहे. ड्रेनेज वाहिन्यांची स्वच्छता न राखल्याने त्या ओव्हरफ्लो होत आहेत. परिणामी वाहिन्या ओव्हरफ्लो होताच दुर्गंधीयुक्त पाणी रस्त्यावर येत आहे. असाच प्रकार शाहूनगर येथे घडला असून आझमनगर तसेच नेहरूनगर या भागातील ड्रेनेजचे पाणी शाहूनगर येथील रस्त्यावर आले असून यामुळे येथील नागरिकांना गैरसोयींचा सामना करावा लागत
आहे.
गटारींच्या स्वच्छतेकडे होणारे दुर्लक्ष आणि यामुळे फुल्ल भरून वाहणाऱया गटारी एकमेकांना जोडलेल्या ड्रेनेज वाहिन्या तुंडुब भरत आहेत. परिणामी आझमनगर व नेहरूनगर येथील सांडपाणी शाहूनगर येथे ओव्हरफ्लो होऊन रस्त्यावर आले आहे. यामुळे ड्रेनेज चेंबरदेखील तुडुंब भरून पाणी रस्त्यावर आल्याचे दिसून आले. सांडपाण्यामुळे सर्वत्र दुर्गंधा पसरली असून नागरिकांमधून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
कचऱयाची उचल होत असताना गटारीत कचरा टाकण्याचे प्रकार घडत असून ड्रेनेज वाहिन्यात कचरा अडकून सांडपाण्याचा योग्य निचरा न झाल्याने सांडपाणी चेंबरमधून रस्त्यावर पसरत आहे. या प्रकारामुळे नागरिकांना त्रास होत असून नागरिकांनी दक्षता घेऊन कचऱयाची योग्य उचल, गटारींची स्वच्छता याकडे लक्ष देणे गरजेचे बनले
आहे.
याकडे दुर्लक्ष झाल्यास संबंधित विभागाकडे तक्रार करून स्वच्छतेकडे लक्ष द्यावे, असे मत व्यक्त होत आहे.