मुंबई/प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन कोर कमिटी आणि शिक्षण संघर्ष संघटनेच्यावतीने आझाद मैदानावर गेल्या तीन दिवसांपासून आंदोलन सुरू आहे. 1 नोव्हेंबर 2005 पूर्वी निवृत्त झालेल्या शिक्षकांना जुनी पेन्शन योजना लागू व्हावी आणि शिक्षकांच्या पाल्यांना त्याचा लाभ व्हावा यासाठी हे आंदोलन सुरू आहे, मात्र सरकारन दखल न घेतल्यामुळे आज निषेध करण्यासाठी शिक्षकांनी मुंडण आंदोलन केलं. सात हजारहून अधिक शिक्षक सध्या आझाद मैदानावर आंदोलन करत आहेत. सरकारने जर आंदोलनाची दखल घेतली नाही तर तीव्र आंदोलनाचा इशारा शिक्षकांनी दिला आहे.