प्रतिनिधी / आटपाडी
आटपाडी तालुक्यातील सर्वसामान्य जनतेची सेवा करत माजी आमदार सदाशिवभाऊ यांनी विकासकामे केली. येथील लोकांच्या समस्या सोडविणे, त्यांना सक्षम करणे हे आमचे ध्येय आहे. आटपाडी तालुक्यात औद्योगिक विकासाला गती देण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अशी ग्वाही विटा नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष वैभव पाटील यांनी दिली.
आटपाडी तालुक्यातील लोकनेते हणमंतराव पाटील दुध संघाच्या घरनिकी येथील मारुती दुध संकलन केंद्रचा दिवाळी बोनस चे वाटप युवानेते वैभवदादा पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. या प्रसंगी ते बोलत होते. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हा कार्यकारणी सदस्य एन. पी. खरजे, मादळमुठीचे सावंत , विकी बेरगळ, महेश पोतदार, अमोल मेटकरी, शामराव मेटकरी, राजेंद्र मेटकरी, कृष्णदेव घाडगे, बाळासो घाडगे, संपतराव माने, ब्रम्हदेव मेटकरी, धर्मराज धायगुडे, शिवाजी खरमोडे, शहाजी तोरणे यांची प्रमुख उपस्थिती होती.
अॅड. मा. वैभव पाटील म्हणाले, आटपाडी तालुक्यातील औद्योगिक विकास करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. तसेच सर्वसामान्य जनता व शेतकरी यांना केंद्रबिंदू मानून विकास करूया. त्यासाठी तुम्ही आमच्यासोबत राहिलात तर आम्ही जनतेच्या विकासासाठी सदैव तत्पर आहोत. असे प्रतिपादन त्यांनी यावेळी केले.