आमदार अनिलभाऊ बाबर यांची माहिती
दिघंची / वार्ताहर
आटपाडी तालुक्यामधील पळसखेल व उंबरगाव या दोन साठवण तलावासाठी तब्बल 10 कोटी रुपये एवढा भरीव निधी मंजूर झाल्याची माहिती खानापूर मतदारसंघाचे आमदार अनिलभाऊ बाबर यांनी दिली.
मुख्यमंत्राी उद्धवजी ठाकरे व जलसंधरण मंत्री शंकर गडाख यांच्या माध्यमातुन पळसखेल व उंबरगाव या दोन साठवण तलावासाठी 10 कोटी रुपये एवढा मोठा निधी मंजूर झाला असून अर्थसंकल्पामध्ये खानापूर मतदार संघांसाठी जलसंधरणासाठी भरीव तरतूद करण्यात येईल असा आशावाद यावेळी आमदार अनिलभाऊ बाबर यांनी व्यक्त केला.