प्रतिनिधी /पणजी
गोव्यात पुढील दोन-तीन दिवसात अतिमहनीय व्यक्ती येणार असून त्यामुळे प्रशासनाची आणि पोलीस यंत्रणेची बरीच धावपळ सुरु झाली आहे. दि. 28 रोजी उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू हे येत आहेत व ते 1 नोव्हेंबरपर्यंत गोव्यात असतील. दि. 29 रोजी केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथसिंग हे देखील गोव्यात येत आहेत आणि ते देखील दि. 1 नोव्हेंबरपर्यंत गोव्यात राहातील. प्राप्त माहितीनुसार केंद्रीय भूपृष्ट वाहतूकमंत्री नितीन गडकरी हे दि. 30 रोजी गोव्यात येत आहेत. त्यांचाही गोव्यात दोन दिवस मुक्काम राहील असे वृत्त रात्री उशिरा हाती आले आहे. या अतिमहनीय व्यक्तींमुळे पोलीस यंत्रणेची बरीच तारांबळ उडणार आहे.