आणखी दोन कोरोना पॉझिटिव्ह : रुग्णसंख्या 149 : कोरोना मुक्त संख्या 56
प्रतिनिधी / सिंधुदुर्गनगरी:
सिंधुदुर्ग जिल्हय़ात आठही तालुक्यांत आता कोविड केअर सेंटर सुरू करण्यात आले आहे. त्यामुळे प्रत्येक तालुक्यांत त्या त्या तालुक्यातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण ठेवले जाणार आहेत. जिल्हय़ात गुरुवारी रात्री उशिरा प्राप्त झालेल्या कोरोना तपासणी अहवालामध्ये कोरोना पॉझिटिव्ह दोन रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे कोरोना बाधित रुग्णांची संख्या 149 वर गेली आहे. जिल्हय़ातील आणखी तीन रुग्ण कोरोना मुक्त झाले आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी व जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. धनंजय चाकूरकर यांनी शुक्रवारी येथे दिली.
जिल्हय़ात गुरुवारी रात्री उशिरा प्राप्त झालेल्या कोरोना तपासणी अहवालात कुडाळ तालुक्मयातील पडवे येथील एक रुग्ण आणि सावंतवाडी तालुक्मयातील मळगाव येथील एक असे दोघे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले. त्यामुळे कोरोना बाधित एकूण रुग्ण संख्या 149 वर गेली आहे. शुक्रवारी आणखी तीन रुग्णांनी कोरोनावर मात केली. त्यामुळे एकूण 56 रुग्ण कोरोना मुक्त झाले आहेत. तसेच तीन रुग्णांचा मृत्यू व एक रुग्ण मुंबईला उपचारासाठी गेला आहे. त्यामुळे सद्यस्थितीत जिल्हय़ात 89 कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
जिल्हय़ातील सर्व तालुक्मयांमध्ये कोवीड केअर सेंटर
केंद्र तसेच राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार लक्षणे नसलेल्या आणि कमी प्रमाणात लक्षणे असलेल्या रुग्णांना कोवीड केअर सेंटर (सी. सी. सी.) मध्ये ठेवण्यात येत आहे. ज्यांना मध्यम स्वरुपाची लक्षणे आहेत, अशा रुग्णांना डेडिकेटेड कोवीड हेल्थ सेंटर (डी. सी. एच. सी.) मध्ये व ज्यांना उपचारांची जास्त गरज आहे, काही इतर आजार (मधुमेह, उच्च रक्तदाब, कॅन्सर) आहेत तसेच ज्यांचे वय 65 पेक्षा जास्त आहे, अशा रुग्णांना डेडिकेटेड कोवीड हॉस्पीटल (डी. सी. एच) मध्ये ठेवण्यात येत आहे. त्या दृष्टीने जिल्हय़ातील प्रत्येक तालुक्मयामध्ये केंद्र व राज्य शासनाच्या सूचनांनुसार कोवीड केअर सेंटर उभारण्यात आले आहे. या सेंटरमध्ये ग्रामीण रुग्णालयातील एक वैद्यकीय अधिकारी किंवा उपजिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधीक्षकांची नोडल अधिकारी म्हणून नेमणूक असेल. सदर नोडल अधिकारी हे रुग्णांची दररोज आरोग्य तपासणी करतील. तर एक बी. ए. एम. एस. डॉक्टर पूर्णवेळ कार्यरत असणार आहेत. तसेच या ठिकाणी ऑक्सजिन सिलिंडर, पल्स ऑक्सीमीटर, रुग्णवाहिका, पीपीई किट, एन 95 मास्क या सर्व सोयी जिल्हा शल्य चिकित्सक यांच्यामार्फत उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. उपचारादरम्यान कोवीड केअर सेंटरमधील रुग्णांमध्ये काही गंभीर स्वरुपाची लक्षणे उद्भवल्यास त्यांना कोवीड हॉस्पीटलमध्ये भरती करण्यात येणार आहे. कोवीड केअर सेंटरसाठी सर्व तालुक्मयातील तहसीलदार व उपविभागीय अधिकारी यांनी जागा निश्चित करून ही केंद्रे उभारली आहेत.
अशा स्वरुपाचे कोविड केअर सेंटर प्रत्येक तालुक्मयात उभारण्यासाठी स्वयंसेवी संस्था तसेच इतर संस्थांनी पुढाकार घ्यावा. तसेच खासगी वैद्यकीय व्यावसायिकांनीही या सेंटरमध्ये आपली सेवा द्यावी, स्वयंसेवकांनी सेवा देण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी केले आहे. या सेंटरमध्ये सेवा देऊ इच्छिणाऱयांनी डॉ. लक्ष्मण दुर्गवाड, मोबाईल क्रमांक 7020941328 यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
सावंतवाडी तालुक्मयातील मळगाव येथे कंटेनमेंट झोन
सावंतवाडी तालुक्मयातील मळगाव येथील जिल्हा परिषद शाळा, ब्राह्मणपाट, मांजरेकरवाडी येथील 300 मीटर परिघातील परिसर कंटेनमेंट झोन म्हणून जाहीर करण्यात आला आहे. या क्षेत्रामधील सर्व आस्थापना, दुकाने, अत्यावश्यक सेवा, वस्तुविक्री 25 जून 2020 रोजीपर्यंत बंद राहणार आहेत. या क्षेत्रामध्ये नागरिकांना येणे व जाणे तसेच सर्व प्रकारच्या वाहनांच्या प्रवेशास बंदी असणार आहे. सदर आदेश हे सार्वजनिक वितरण व्यवस्था, वैद्यकीय उपचार व्यवस्था, बँक इ. वितरीत करणारे अधिकारी, सेवा देणारे अधिकारी, कर्मचारी यांची वाहने यांना लागू असणार नसल्याचे सावंतवाडीचे प्रांताधिकारी सुशांत खांडेकर यांनी स्पष्ट केले आहे.
पाठविण्यात आलेले एकूण नमुने 02897
अहवाल प्राप्त झालेले नमुने 02764
आतापर्यंत पॉझिटिव्ह नमुने 00149
निगेटिव्ह आलेले नमुने 02615
अहवाल प्राप्त न झालेले नमुने 00119
सद्यस्थितीत जिल्हय़ातील सक्रिय रुग्ण 00089
डिस्चार्ज देण्यात आलेले रुग्ण 00056
मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या 00003
विलगीकरण कक्षात दाखल रुग्ण 00121
शुक्रवारी तपासणी केलेल्या व्यक्ती 04224
संस्थात्मक अलगीकरणातील व्यक्ती 26308
शासकीय संस्थांमधील अलगीकरणातील व्यक्ती 00244
गाव पातळीवरील संस्थात्मक अलगीकरणातील व्यक्ती 24437
नागरी क्षेत्रातील संस्थात्मक अलगीकरणातील व्यक्ती 01627
2 मेपासून जिल्हय़ात आलेल्यांची संख्या 88769