अचूक बातमी “तरुण भारत”ची, शनिवार 8 जानेवारी 2022, सकाळी 11.30
● शुक्रवारी दिवसभरात 292 जण नव्याने बाधित
● गेल्या आठ दिवसात 2 मृत्यू
● जिल्ह्याची पॉझिटिव्हीटी 7.26 वर
● कोरोनामुक्ती आठ दिवसात 305
सातारा / प्रतिनिधी :
जिल्ह्यातील नागरिकांना नोव्हेंबर, डिसेंबर या दोन महिन्यात ज्या प्रमाणात दिलासा मिळाला होता. त्याच प्रमाणात जानेवारी महिन्याच्या पहिल्या आठ दिवसात होत असलेली बाधित वाढ पहाता केवळ मृत्यूदर रोखण्यात यश आले आहे. दररोज करण्यात येणाऱ्या तपासण्या वाढवण्यात आलेल्या आहेत. गेल्या आठ दिवसात 25 हजार 600 जणांचे स्वॅब तपासणी करण्यात आले. त्यामध्ये 1180 जण आठ दिवसात नव्याने बाधित आढळून आले. गेल्या आठ दिवसात 305 जणांची कोरोना मुक्ती झाली आहे तर दोन जणांचा बळी कोरोनामुळे गेलेला आहे. गेल्या 24 तासात जिल्ह्यात नव्याने 292 जण बाधित आढळून आले असून जिल्ह्याचा पॉझिटिव्हीटी 7.26वर पोहचला आहे.
मृत्यूदर रोखण्यात यश
जिल्ह्यात नवीन वर्षाच्या पहिल्या दिवसापासून कोरोनाचे रुग्ण वाढत चालले आहेत. ही बाधित वाढ रोखण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा जिल्हा प्रशासनाने सुरू ठेवली आहे. मात्र, सध्याचे वातावरण पहाता आरोग्य विभाग त्यातून प्रयत्न करत आहे. त्यामुळे मृत्यूदर हा रोखला गेला आहे. आठ दिवसात दोन जणांचा कोरोनामुळे बळी गेलेला आहे.
कोरोनामुक्तीचे प्रमाण कमी
कोरोनामुक्ती ही रुग्ण संख्या कमी असल्याने जानेवारीच्या पहिल्या दिवसापासून पहायला मिळत आहे. आठ दिवसात सर्वात कमी कोरोनामुक्ती दि.4 रोजी 3 जणांची झालेली आहे तर सर्वात जास्त कोरोनामुक्ती दि.7 रोजी 185 जणांची झालेली आहे.
आठ दिवसात 1180 जण बाधित
गेल्या आठ दिवसात बाधितवाढ ही चढत्या क्रमाने राहिली आहे. जानेवारीत पहिल्या दिवशी 53 जण बाधित होते तर दि.8 रोजी जाहीर झालेल्या अहवालात 292 जण बाधित आढळून आले, असे आठ दिवसात 1180 जण बाधित झाले आहेत.
शनिवारी
नमुने-4019
बाधित-292
शनिवारपर्यंत
नमुने-23,99,339
बाधित-2,53,647
मृत्यू-6500
मुक्त-2,45,299