क्रीडा प्रतिनिधी /फोंडा
आडपई-फोंडा येथील हनुमान स्पोर्टस् व कल्चरल क्लबतर्फे ‘पॅडालॉन 60’ सायक्लींग मॅराथॉन स्पर्धा 26 रोजी सकाळी 5.30 वा. आयोजित करण्यात आली आहे. स्पर्धकांना 60 किमी. चे अंतर पार करावे लागेल. आडपई येथून स्पर्धेला प्रारंभ होणार आहे. उंडीर, करंजाळे, मडकई, कुंडई बायपास, कुंडई सर्कल, मंगेशी बायपास, म्हार्दोळ बायपास, जीव्हीएम सर्कल फर्मागुडी, ढवळी बायपास, ढवळी सर्कल, बोरी, राय, पेप्सी सर्कल फातोर्डा येथून परत ढवळी बायपास, कपिलेश्वरी, कवळे, दुर्भाट व आडपई असा स्पर्धेचा मार्ग राहिल. प्रवेश शुल्क रू. 350 असेल. स्पर्धकांनी हेल्मेट व बुट घालणे आवश्यक असेल. स्पर्धकांनी सकाळी 5 वा. आडपई येथे उपस्थित रहावे. विजेत्यांना चषक, आकर्षक पारितोषिके व प्रशस्तीपत्रे देण्यात येतील. अधिक माहितीसाठी गौरेश 9823851830 यांच्यांशी संपर्क साधावा.