सोशल मीडियावर छायाचित्र व्हायरल
सोशल मीडियावर व्हायरल झालेले हे छायाचित्र लोकांच्या चेहऱयावर हास्य उमटवत आहे. या छायाचित्रात एक व्यक्ती भांडी घासताना दिसून येत आहे. तर त्याच्या जवळ उभी असलेली महिला ‘जीवन में सफलता कैसे पाएं’ नावाचे पुस्तक वाचत आहे. लोक त्यांना पती-पत्नीच्या स्वरुपात पाहत असल्याने हे छायाचित्र सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरले आहे.
हे छायाचित्र आयपीएस अधिकारी दीपांशू काबरा यांनी ट्विटवर पोस्ट केले आहे. ‘आणखीन किती यश हवे’ असे त्यांनी कॅप्शनमध्ये म्हटले आहे. त्यांच्या ट्विटला आतापर्यंत साडेतीन हजारांहून अधिक लाइक्स आणि 273 रीट्विट मिळाले आहेत. तसेच लोक यावर मजेशीर प्रतिक्रियाही देत आहेत.
काही वापरकर्त्यांनी या पोस्टवर स्वतःची नाराजीही व्यक्त केली आहे. स्त्रियांचे यश केवळ घरकामापुरती मर्यादित आहे का? पुरुषांनी स्वयंपाक केला तर त्यात त्यांचे अपयश कसले असे प्रश्न काही जणांनी उपस्थित केले आहेत.