वृत्तसंस्था/मुंबई :
रिलायन्स जिओची पॅरेंट कंपनी जिओ प्लॅटफॉर्म स्ट्रटेजिक फायनान्शिअर इन्वेस्टर्सला 8 टक्के हिस्सेदारी आणखी विकण्याची शक्मयता आहे. अमेरिकेतील खासगी इक्विटी संस्था सिल्वर लेक आणि सेशल मीडीयातील दिग्गज कंपनी फेसबुकने जिओ प्लॅटफॉर्ममध्ये काही दिवसांपूर्वी गुंतवणूक केली होती.
अभ्यासकांच्या माहितीनुसार मोठय़ा भागभांडवल विक्रीमधून जिओ आपली बॅलेन्सशीट मजबूत करणार आहे आणि भविष्यातील रोख व्यवहारांसाठीची मागणी पूर्ण करण्यासाठी आयपीओचा आधार कंपनी घेणार आहे. परंतु त्यात घट होण्याचा अंदाज असल्याने 5 जी सेवा उभारण्यातही अन्य दूरसंचार कंपन्यांपेक्षा मोठी मजल मारण्याची शक्मयता आहे. रिलायन्स इंडस्ट्रीजच्या व्यवस्थापनाच्या माहितीनुसार भागभांडवलाच्या विक्रीतून 5 जीची उपकरणे विकत घेण्यास जिओ प्लॅटफॉर्मला मोठी मदत होणार असल्याचेही सांगण्यात येत आहे.