मध्यप्रदेश काँगेसला लागलेली गळती सुरूच
वृत्तसंस्था / भोपाळ
मध्यप्रदेशात काँगेसला लागलेली गळती थांबण्याची चिन्हे नाहीत असे वातावरण आहे. या पक्षाच्या आमदार सुमित्रादेवी कासडेकर यांनी पक्षसदस्यत्वाचा आणि विधानसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. बऱहाणपूर जिल्हय़ातील नेपानगर या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व त्या करीत होत्या. काही दिवसांपूर्वीच प्रद्युम्नसिंग लोधी या आमदारांनीही त्यागपत्र दिले होते. कासडेकर यांचा राजीनामा स्वीकारण्याची प्रक्रिया सुरू आहे, अशी प्रतिक्रिया विधानसभाध्यक्ष रामेश्वर शर्मा यांनी व्यक्त केली.
कासडेकर यांचा राजीनामा स्वीकारला गेल्यास काँगेसची विधानसभेतील सदस्यसंख्या 90 होणार आहे. ज्येष्ठ नेते ज्योतिरादित्य सिंदिया यांच्या 22 समर्थक आमदारांनी काही महिन्यांपूर्वी काँगेसला सोडचिठ्ठी दिल्याने राज्यातील कमलनाथ सरकार कोसळले होते. त्यानंतही काँगेस आमदारांचे राजीनामा सत्र सुरूच राहिले आहे. लोधी यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. कासडेकरही तोच कित्ता गिरवितील अशी शक्यता सूत्रांनी व्यक्त केली आहे.
मध्यप्रदेश विधानसभेची एकंदर सदस्यसंख्या 230 आहे. पण 23 जणांचे राजीनामे आण्sिा दोन जागा रिक्त यामुळे सध्या ती 205 आहे. कासडेकर यांचा राजीनामा स्वीकारल्यानंतर ती 204 होणार आहे. सर्व 26 रिक्त जागी आता लवकरच पोटनिवडणुका घ्याव्या लागणार आहेत.