रविवारी 25 नवे रुग्ण, बिम्स कर्मचाऱयांचाही समावेश
प्रतिनिधी/ बेळगाव
बेळगाव शहर व तालुक्मयातील महाविद्यालये सुरू झाल्यानंतर आरोग्य विभागाने विद्यार्थ्यांची स्वॅब तपासणी हाती घेतली आहे. शनिवारी तीन विद्यार्थ्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता. रविवारी आणखी दोन विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. दिवसभरात 25 नवे रुग्ण आढळून आले आहेत.
बेळगाव शहर व उपनगरातील 12 व ग्रामीण भागातील 1 असे तालुक्मयातील 13 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहे. दोन महाविद्यालयीन विद्यार्थी व बिम्स हॉस्टेलमधील दोन विद्यार्थ्यांचे अहवाल पॉझिटिव्ह आले असून एकूण बाधितांची संख्या 25 हजार 641 वर पोहोचली आहे.
बॉक्साईट रोड, कणबर्गी, महाद्वार रोड, अंजनेयनगर, येळ्ळूर, जाधवनगर, जेएनएमसी कॅम्पस, बिम्स कॅम्पसमध्ये रविवारी पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले असून आणखी 3 हजार 335 हून अधिक स्वॅब तपासणी अहवाल यायचे आहेत. जिल्हय़ात सध्या 274 सक्रिय रुग्ण आहेत.
आतापर्यंत 25 हजार 026 हून अधिक जणांनी कोरोनावर मात केली आहे. 2 लाख 86 हजार 90 जणांची स्वॅब तपासणी करण्यात आली होती. 2 लाख 55 हजार 543 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहे. अद्याप 36 हजार 333 जण चौदा दिवसांच्या होमकेयरमध्ये आहेत.
आरोग्य विभागाच्या अधिकाऱयांनी दिलेल्या माहितीनुसार गेल्या महिनाभरात रुग्णसंख्या घटली आहे. 17 नोव्हेंबरपासून महाविद्यालये सुरू करण्यात आली आहेत. त्यामुळे प्राध्यापक व विद्यार्थ्यांचीही स्वॅब तपासणी करण्यात आली आहे. बेळगावात प्राध्यापक व विद्यार्थ्यांचेही अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.