प्रतिनिधी/ बेळगाव
उपचारानंतर कोरोनामुक्त झालेल्या आणखी 11 जणांना शुक्रवारी सिव्हिल हॉस्पिटलमधून घरी पाठविण्यात आले. आतापर्यंत जिल्हय़ातील कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या 219 वर पोहोचली आहे. तर हुक्केरी तालुक्मयातील एका महिलेचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.
शुक्रवारी सायंकाळी राज्य आरोग्य विभागाने जारी केलेल्या आरोग्य बुलेटिननुसार धोंडगट्टे (ता. हुक्केरी) येथील 32 वषीय महिलेचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. तिला सिव्हिल हॉस्पिटलमधील विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले आहे. या विभागात एकूण 85 बाधितांवर उपचार सुरू आहेत.
बेळगाव जिल्हय़ातील एकूण बाधितांची संख्या 297 वर पोहोचली आहे. तर यापैकी 219 जण पूर्णपणे बरे झाले असून त्यांना घरी जावू देण्यात आले आहे. जिल्हा सर्वेक्षण विभागाने दिलेल्या माहितीनुसार जिल्हय़ातील 15 हजार 129 जणांच्या आरोग्यावर बारकाईने लक्ष ठेवण्यात आले आहे. तर अद्याप 2 हजार 787 जण 14 दिवसांच्या क्वारंटाईनमध्ये आहेत.
आतापर्यंत जिल्हय़ातील 13 हजार 833 जणांचे स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आले आहे. यापैकी 12 हजार 879 जणांचा अहवाल निगेटिव्ह तर 297 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. हिरेबागेवाडी येथील एका वृद्धेचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. एकीकडे रुग्ण संख्या वाढत असतानाच बरे होणाऱयांची संख्याही वाढती आहे.
316 अहवलांची प्रतीक्षा
शुक्रवारी सायंकाळी मिळालेल्या माहितीनुसार जिल्हा प्रशासनाला आणखी 316 जणांच्या स्वॅब तपासणी अहवालांची प्रतीक्षा आहे. मुंबईसह महाराष्ट्रातून विविध भागातून जिल्हय़ात येणाऱया चाकरमान्यांना क्वारंटाईनमध्ये ठेवण्यात आले आहे. 14 दिवसांच्या क्वारंटाईनमधील संख्या 3 हजारांच्या घरात आहे. अद्याप त्यांची स्वॅब तपासणी व्हायची आहे. जिल्हा प्रशासनाने आतापर्यंत 88 प्रतिबंधित क्षेत्र जाहीर केले आहे. यापैकी बेळगुंदी, पिरनवाडी, येळ्ळूर, आझाद गल्ली, कॅम्प, आस्मा कॉलनी, संकेश्वर, कुडची, अमाननगर, हिरेबागेवाडी या दहा विभागातील निर्बंध उठविण्यात आले आहेत.
बॅगामुळे खळबळ
कोरोना वॉर्डसमोर शुक्रवारी सकाळी काही बॅगा आढळून आल्या आहेत. कोरोनामुक्त होवून घरी परतणाऱया रुग्णांनी आपले कपडे व इतर साहित्य बॅगमध्ये घालून वॉर्डसमोरच टाकून गेल्याचे उघडकीस आले आहे. खरे तर या वॉर्डसमोर कोणीही फिरकत नाहीत. सुरक्षा रक्षक व बिम्स कर्मचाऱयांच्या निदर्शनास हा प्रकार आला. त्यांनी ते बाजूला काढून ठेवले आहेत.