नवी दिल्ली : फ्रान्सकडून विकत घेतलेली अत्याधुनिक राफेल लढाऊ विमानांची तिसरी बॅच गुरुवारी रात्री उशिरा भारतात दाखल झाली. कोठेही न थांबता 7,000 किमीचे अंतर या विमानांनी पार केले असून या विमानांनी प्रवास सुरू असताना हवेतच इंधन भरण्याची प्रक्रिया पूर्ण करत आपली कार्यक्षमता सिद्ध केली. फ्रान्सच्या इस्ट्रेस हवाई तळावरून निघालेली ही तीन राफेल विमानांची बॅच बुधवारी रात्री भारतातील हवाई तळावर दाखल झाली. तत्पूर्वी या विमानांमध्ये इंधन भरण्यासाठी युएई एअर फोर्सने पाठवलेल्या इंधन टँकरसाठी भारताने ट्विटद्वारे आभार मानले. हवाई दलाने गुरुवारी या प्रवासासंबंधी सविस्तर माहिती दिली.भारताने फ्रान्सकडून एकूण 36 राफेल विमाने विकत घेतली आहेत.
यांपैकी आत्तापर्यंत भारतात तीन बॅचमध्ये एकूण 9 विमाने दाखल झाली आहेत. येत्या मार्चमध्ये आणखी तीन राफेल विमाने भारतात दाखल होणार आहेत. त्यानंतर एप्रिल महिन्यांत आणखी सात विमाने पाठविली जाणार आहेत. पाच विमानांची पहिली बॅच भारतात 28 जुलै रोजी दाखल झाली होती.