प्रतिनिधी/ रत्नागिरी
मंगळवारी रात्री व बुधवारी दुपारी प्राप्त झालेल्या अहवालानुसार जिह्यात 32 नवे रुग्ण सापडले असून कोरोना बाधीतांच्या संख्येने आठशेचा टप्पा ओलांडला आहे. यापुर्वी पॉझिटिव्ह आढळलेल्या जिल्हा प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱयाच्या पत्नीलाही कोरोनाची लागण झाली आहे. रत्नागिरीत एका खासगी वैद्यकीय अधिकाऱयाची पत्नी व आई. गुहागरातील प्रतिष्ठीत व्यापारी, मंडणगडात तीन डॉक्टर, घरडाचे आणखी 4 कर्मचारी कोरोना बाधीत झाले आहेत. नव्या रूग्णांमुळे बाधीतांची एकूण संख्या 813 झाली आहे.
बुधवारी कोरोनातून बरे झालेल्या 15 रूग्णांना घरी सोडण्यात आले आहे. त्यामुळे कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या 522 झाली आहे. लांजा येथून एकाला, जिल्हा कोव्हीड रुग्णालय 2, दापोली 4, पेढांबे 5, घरडा 3 अशा 15 रुग्णांना बरे झाल्याने घरी सोडण्यात आले.
मंगळवारी रात्रीपासून पॉझीटीव्ह अहवाल आलेल्यांमध्ये रत्नागिरीतील 8, लांजा 4, राजापूर 5, मंडणगड 4, दापोली 5, कळंबणी 5 व संगमेश्वरमधील एकाचा समावेश आहे. दरम्यान, रत्नागिरीत होम क्वारंटाईन असलेल्या वरीष्ठ प्रशासन अधिकाऱयाचा दुसराही रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. त्याच्या पत्नीलाही कोरोनाची लागण झाली असून मुलाचे रिपोर्ट मात्र निगेटिव्ह आहेत. आतापर्यंत कोरोनामुळे 28 जणांचा मृत्यू झाला असून उपचाराखाली असलेल्या रूग्णांची संख्या 263 आहे.
खेडमध्ये 5 नवे रूग्ण
खेडः बुधवारी दुपारी प्राप्त अहवालानुसार आणखी 5 जणांना कोरोनाची लागण झाल्याचे तालुक्याची रूग्ण संख्या 139 झाली आहे. यामध्ये घरडा वसाहतीतील 4, तर खोपीतील एकाचा समावेश आहे. तालुक्यात आतापर्यंत 73 रूग्णांनी कोरोनावर मात केली आहे.
लांजात बँक कर्मचाऱयाऱयासह चौघे बाधीत
लांजाः मंगळवारी रात्री आलेल्या अहवालामध्ये लांजा तालुक्यात 4 नवे रुग्ण सापडले आहेत. यामध्ये लांजा शहरात एकाच घरातील दोघे, शहरातील एका बँकेचा कर्मचारी तसेच वाडीलिंबू येथील एकजण पॉझिटीव्ह आढळला आहे.
एकाच घरातील अहवाल या आधी निगेटीव्ह आला होता. मात्र त्यांना पुन्हा कोरोनाचा संसर्ग झाला आहे. बँकेचा कर्मचारी पॉझिटीव्ह आढळताच बँकेतील सर्व कर्मचाऱयांची तपासणी सुरू करण्यात आली आहे.
वेसवीत एकाच कुटुंबातील चौघे पॉझीटीव्ह
मंगळवारी रात्री उशिरा प्राप्त झालेल्या अहवालानुसार वेसवी येथील एकाच कुटुंबातील चौघेजण पॉझीटीव्ह आढळले आहेत. या चौघांमध्ये तिघे वैद्यकीय व्यावसायिक असून त्यांनी स्वतःहून लक्षणे जाणवल्याने स्वॅब दिले होते. नव्या रूग्णांमुळे तालुक्यातील कोरोनाबाधितांची संख्या 28 झाली आहे.
मूळचा मंडणगडचा पण दापोली आरोग्य विभागात कार्यरत असलेल्या कर्मचाऱयाचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याने संपर्कातील 32 जणांचे स्वॅब तपासणीसाठी पाठण्यात आले होते. मात्र वेसवी येथील वैद्यकीय व्यावसायिक व त्याच्या कुटुंबातील तीन सदस्य त्या कोरोनाबाधिताच्या संपर्कात आले नसल्याचे समजते. त्यामुळे त्यांना कोणापासून संसर्ग झाला याचा शोध घेतला जात आहे. दरम्यान, वेसवी येथे कोरोना रुग्ण आढळून आल्याने बुधवारी पूर्ण बाजारपेठ बंद ठेवण्यात आली. तसेच रोगाचा संसर्ग वाढू नये यासाठी उपाययोजना राबवण्यात आल्याची माहिती सरपंच वैभव भाटे यांनी दिली.
सध्या एकूण ?क्टीव्ह पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 263 आहे. भाटय़े रोड, राजिवडा, नर्सिंग हॉस्टेल, शंखेश्वर गार्डन गीता भुवन, मौजे नरशिंगे, मौजे साईनगर कुवारबाव व गद्रे कंपनी, सन्मित्र नगर हे सात क्षेत्र कोरोना विषाणू बाधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले आहे
ङसायंकाळची स्थिती खालीलप्रमाणेङ
एकूण पॉझिटिव्ह – 813
बरे झालेले – 522
मृत्यू – 28
?क्टीव्ह पॉझिटिव्ह – 263
पैकी 08 रुग्ण होम आयसोलेशन,
3 रुग्ण इतर जिल्हयात उपचारासाठी गेले,
?क्टीव्ह कन्टेंनमेन्ट झोन
जिह्यात सध्या 74 ?क्टीव्ह कन्टेन्मेंट झोन असून रत्नागिरी तालुक्यात 24 गावांमध्ये, दापोली मध्ये 8 गावांमध्ये, खेड मध्ये 9 गावांमध्ये, लांजा तालुक्यात 6, चिपळूण तालुक्यात 20 गावांमध्ये,मंडणगड तालुक्यात 1 आणि राजापूर तालुक्यात 6 गावांमध्ये कंटेन्मेंट झोन आहेत.
संस्थात्मक विलगीकरण
संस्थात्मक विलगीकरणात रुग्णालयांची स्थिती पुढीलप्रमाणे आहे. शासकीय सामान्य रुग्णालय, रत्नागिरी – 45, कोव्हीड केअर सेंटर, समाजकल्याण भवन, रत्नागिरी – 1, उपजिल्हा रुग्णालय, कामथे – 8, उपजिल्हा रुग्णालय, कळबणी – 1, कोव्हीड केअर सेंटर, घरडा, लवेल – 7, ग्रामीण रुग्णालय गुहागर-2, केकेव्ही, दापोली – 4 असे एकूण 68 संशयित कोरोना रुग्ण दाखल आहेत.
होम क्वॉरंटाईन
मुंबईसह एम.एम.आर.क्षेत्र तसेच इतर जिल्हयातून आलेल्या व्यक्तींना होम क्वारंटाईन केले जाते. आज अखेर होम क्वारंटाईन खाली असणांरांची संख्या 16 हजार 775 इतकी आहे.
10 हजार पेक्षा जास्त निगेटिव्ह
जिल्हा रुग्णालयामार्फत एकूण 11 हजार 470 नमुने तपासण्यात आले असून त्यापैकी 10 हजार 316 तपासणी अहवाल प्राप्त झाले आहेत. त्यातील 806 अहवाल पॉजिटीव्ह आले असून 10 हजार 316 अहवाल निगेटीव्ह आले आहेत. अजून 313 नमुन्यांचा अहवाल प्राप्त झालेला नाही. 313 रत्नागिरी येथील प्रयोगशाळेमध्ये प्रलंबित आहेत.
होम क्वारंटाईन म्हणून शिक्का मारलेला कोणीही इसम बाहेर फिरताना दिसल्यास त्याबाबतची माहिती जिल्हा नियंत्रण कक्षात 7057222233 हा व्हॉटस?प क्रमांक, नियंत्रण कक्षाचे दूरध्वनी क्रमांक 02352-222233 व 226248, आपल्या नजीकच्या आरोग्य केंद्रात, पोलीस यंत्रणा अथवा ग्रामपातळीवर ग्राम कृति दलाना देण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात येत आहे.
सदरची आकडेवारी जिल्हा सामान्य रुग्णालयातील कोव्हीड-19 कक्षाकडून प्राप्त झाली आहे. ही माहिती दि. 08 जुलै 2020 रोजी सायंकाळी 6 वाजेपर्यंतची आहे. यानंतर अहवाल प्राप्त झाल्यास यात बदल होवू शकतो. पुढील अपडेट मध्ये सकाळी 12 पूर्वी याची माहिती देण्यात येईल.