कोरोनामुक्त संख्या 3 हजार 237 : सक्रिय रुग्णसंख्या 881
प्रतिनिधी / सिंधुदुर्गनगरी:
सिंधुदुर्ग जिल्हय़ात आणखी 58 पॉझिटिव्ह रुग्ण आढळले असून सावंतवाडी तालुक्मयातील एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. तर बरे झालेल्या 64 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी दिली आहे. दरम्यान पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये आठ रुग्णांची प्रकृती चिंताजनक असून अतिदक्षता विभागामध्ये त्यांच्यावर उपचार सुरू आहेत, अशी माहिती देण्यात आली.
गेल्या आठ दिवसांपासून जिल्हय़ात कोरोना रुग्ण संख्या मंदावली आहे. मंगळवारी 104 रुग्ण आढळल्याने रुग्ण संख्या वाढली होती. मात्र बुधवारी पुन्हा रुग्ण संख्या कमी झाली असून नव्याने 58 रुग्ण आढळले. त्यामुळे जिल्हय़ात कोरोना बाधितांची एकूण रुग्णसंख्या 4 हजार 222 झाली आहे. तसेच कोरोनाने मृत्यू होण्याचे प्रमाणही कमी होत असून मंगळवारी एकही रुग्ण दगावला नाही. बुधवारी एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. तसेच बरे होणाऱया रुग्णांची संख्या वाढत असून बुधवारी आणखी 64 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. त्यामुळे आतापर्यंत 3 हजार 237 रुग्ण बरे होऊन कोरोना मुक्त झाले आहेत. सद्यस्थितीत जिल्हय़ात 881 सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी दिली.
सिंधुदुर्ग जिल्हय़ातील रुग्णस्थिती
नवीन पॉझिटिव्ह रुग्ण 58
सद्यस्थितीतील सक्रिय रुग्ण 881
कोरोनामुक्त झालेले रुग्ण 3237
आतापर्यंत मृत झालेले रुग्ण 104
आतापर्यंतचे एकूण पॉझिटिव्ह 4222
पॉझिटिव्हपैकी चिंताजनक 8
तालुकानिहाय आतापर्यंतचे पॉझिटिव्ह
देवगड 276
दोडामार्ग 182
कणकवली 1444
कुडाळ 954
मालवण 312
सावंतवाडी 531
वैभववाडी 136
वेंगुर्ले 373
जिल्हय़ाबाहेरील रुग्ण 13
तालुकानिहाय कोरोनामुळे झालेले मृत्यू
देवगड 6
दोडामार्ग 2
कणकवली 22
कुडाळ 18
मालवण 11
सावंतवाडी 28
वैभववाडी 8
वेंगुर्ले 8
जिल्हय़ाबाहेरील रुग्ण 1
टेस्ट रिपोर्ट
आरटीपीसीआर टेस्ट नमुने 17,556
पैकी पॉझिटिव्ह नमुने 3,139
ऍन्टिजेन टेस्ट नमुने 11,179
पैकी पॉझिटिव्ह नमुने 1,180
अतिदक्षता विभागात दाखल 8