कोरोना सक्रिय रुग्णसंख्या 1143 : महिला पोलीस अधिकारी पॉझिटिव्ह : कोरोना मुक्त संख्या 1168
प्रतिनिधी / ओरोस:
शनिवारी जिल्हय़ात आणखी 99 रुग्णांचे कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे सक्रिय रुग्णांची संख्या 1143 वर पोहोचली आहे. दरम्यान पॉझिटिव्ह अहवालात जिल्हा पोलीस मुख्यालयातील एका महिला पोलीस अधिकाऱयाचा समावेश आहे. कोरोना रुग्णसंख्येचा आकडा वाढत असतानाच बरे होणाऱयांची संख्याही वाढत आहे. आतापर्यंत एकूण 1168 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. धनंजय चाकूरकर यांनी दिली.
तपासण्यात आलेले एकूण नमुने 19546
आतापर्यंतचे एकूण पॉझिटिव्ह नमुने 2348
आतापर्यंतचे एकूण निगेटिव्ह नमुने 16883
अहवाल प्राप्त न झालेले नमुने 315
सद्यस्थितीत जिल्हय़ातील सक्रिय रुग्ण 1143
मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या 37
डिस्चार्ज देण्यात आलेले रुग्ण 1168
गृह व शासकीय संस्थात्मक अलगीकरणातील व्यक्ती 8487
नागरी क्षेत्रातील संस्थात्मक अलगीकरणातील व्यक्ती 4535