वारणेचे वस्ताद प्रकाश पाटील यांचे निधन
वारणानगर :
वारणा व्यायाम मंदिराचे वस्ताद, तात्यासाहेब कोरे प्रशिक्षण केद्राचे प्रशिक्षक, आंतरराष्ट्रीय कुस्ती मैदानाचे शिल्पकार प्रकाश राजाराम पाटील (वय 58 मुळगाव कांदे, ता. शिराळा जि. सांगली) यांचे कोल्हापुरात निधन झाले.
पै. प्रकाश पाटील यांचा कोरोना अहवाल पॉझिटीव्ह आल्यानंतर शिराळा येथील रुग्णालयात त्यांच्यावर गेले पाच दिवस उपचार सुरू होते. शुक्रवारी त्यांची प्राणज्योत मालवली.
वारणा समूहाचे संस्थापक सहकारमहर्षी (स्व.) तात्यासाहेब कोरे यानी सन 1989 मध्ये प्रकाश पाटील यांना वारणा व्यायाम मंदिरात वस्ताद म्हणून नियुक्त केलेपासून अनेक राज्य, राष्ट्रीय स्तरावरील नामाकिंत मल्ल त्यानी घडवले. वारणा समूहाचे संस्थापक स्व. तात्यासाहेब कोरे यांच्या निधनानंतर त्यांच्या पुण्यतिथी निमित्त प्रत्येक वषी दि.13 डिसेंबर रोजी वारणानगर येथे भव्य आंतरराष्ट्रीय कुस्ती मैदान भरवण्यासाठी व ते यशस्वी करणयासाठी वस्ताद प्रकाश पाटील यांचा सिंहाचा वाटा असायचा. तेथे पाकिस्तान, उजबेगीस्थान,जपान, रशिया, जॉर्जिया यासह अनेक देशातील खेळले. शिवाय, देशातील ऑलिम्पिक विजेते, हिंदकेसरी, राज्य स्तरावरील केसरी किताब जेत्या अनेक नामवंत मल्लानी वारणेत नशीब आजमावले.
वारणेतील मैदानामुळे वस्ताद प्रकाश पाटील यांचा कोल्हापूर जिल्हा तालीम संघ, महाराष्ट्र राज्य व अखिल भारतीय कुस्तीगीर परिषदेवर चांगलाच दबदबा होता. आ. कोरे यांचा विश्वासू सहकारी म्हणून देखील त्यांची सर्वत्र ओळख कायम राहिली.
वस्ताद प्रकाश पाटील यांच्या निधनाने कुस्ती क्षेत्रावर शोककळा पसरली आहे प्रकाश पाटील यांच्या जाण्याने कुस्ती क्षेत्राचे मोठे नुकसान झाले आहे वारणेतील व्यायाम मंदीर व कुस्ती प्रशिक्षण केंद्रावर शोकसागरात बुडाल्यासारखे दु:ख व्यक्त होत आहे.
आमदार विनय कोरे यांचे विश्वासू सहकारी ……
वारणा समूहात आ. विनय कोरे यांचे पर्व सुरू झाले पासुन प्रकाश पाटील हे विनय कोरे यांच्या दौऱयात कायम त्याच्या सोबत असायचे अखेर पर्यन्त ही सोबत त्यानी टिकवत संपूर्ण कोरे कुंटूबातील सर्वाचाच ते एक भाग कायम राहिले
वस्ताद पाटील यांचे कांदे येथील कुटूंब गावातील पुढारलेले कुटूंब आहे त्याचे वडील (स्व.) राजाराम पाटील हे वारणा साखर कारखान्याचे संचालक होते सद्या पत्नी शोभा प्रकाश पाटील या श्री.वारणा सह. दूध उत्पादक प्रक्रिया संघाच्या संचालिका आहेत त्यांच्या पाश्चात पत्नी दोन मुले, एक मुलगी, सुना, नातवंडे असा परिवार आहे.