बेंगळूर/प्रतिनिधी
आरोग्य आणि वैद्यकीय शिक्षणमंत्री डॉ. के. सुधाकर यांनी सांगितले की, कर्नाटक देशात ६ व्या स्थानावर असून यापूर्वी ४८ लाखांहून अधिक लोकांना लसीकरण करण्यात आले आहे, असे ते मंगळवारी बेंगळूरमध्ये माध्यमांशी बोलत होते.
“कालपर्यंत ४८.०५ लाख लोकांना लसी देण्यात आल्या आहेत, गेल्या २४ तासांत १ ९५, ५५४ लोकांना लस देण्यात आली आहे. दरम्यान लसीकरण झालेल्या २२.५ लाखांहून अधिक लोक वयाच्या ६० वर्षांवरील आहेत. १०.४ लाख लोक ४५ वर्षे वयोगटातील आहेत.
कर्नाटक लसीकरण मोहीम राबविण्यात देशात सहाव्या क्रमांकावर आहे. महाराष्ट्र, गुजरात, राजस्थान, उत्तर प्रदेश आणि पश्चिम बंगाल या मोहिमेत अग्रेसर असणारी इतर राज्ये आहेत, असे ते म्हणाले. आमच्या विनंतीला केंद्र सरकारने सकारात्मक प्रतिसाद दिला असून वेळेत लस पुरवठा होत आहे.