प्रतिनिधी / बेळगाव :
महापालिकेने यंदा 45 कोटी घरपट्टी वसूल करण्याचे उद्दी÷ ठेवले आहे. यापैकी आतापर्यंत 19 कोटी 70 लाख रूपये घरपट्टी जमा झाली आहे. लॉकडाऊनमुळे घरपट्टी भरणाऱयांच्या संख्येत घट झाली आहे. तसेच घरपट्टीवरील 5 टक्के सवलतीची मुदत संपु÷ात आली असून, दि. 1 नोव्हेंबर पर्यंत विना दंड घरपट्टी भरता येणार आहे. त्यानंतर प्रति महिना 2 टक्के दंड भरावा लागणार आहे.
यंदा घरपट्टी 15 ते 25 टक्क्मयाची वाढ करण्यात आली आहे. तसेच कचरा व्यवस्थापन सर्व्हीस चार्जची आकारणी करण्यात येत आहे. मात्र कोरोना विषाणुचा प्रसार वाढल्याने लॉकडाऊन करण्यात आले होते. त्यामुळे घरपट्टी वाढ रद्द करण्यात यावी. तसेच कचरा व्यवस्थापन सर्व्हीस चार्जची आकारणी रद्द करावी अशी मागणी करण्यात आली होती. त्यामुळे काही मालमत्ताधारकांनी जुलै अखेर पर्यंत घरपट्टी भरली नव्हती. पण जुलै अखेरीस कचरा व्यवस्थापन सर्व्हीस चार्जची आकारणी मागे घेण्यात आली आहे. पण वाढीव घरपट्टी जैसेथे आहे. एप्रिल पासून कचरा व्यवस्थापन सर्व्हीस चार्जची आकारणी करण्यात येत होती. जुलै अखेर पर्यंत असंख्य मालमत्ता धारकांनी घरपट्टीसोबत कचरा व्यवस्थापन सर्व्हीस चार्ज जमा केला आहे. त्यामुळे सर्व्हीस चार्जची भरलेली रक्कम परत मिळणार का? असा मुद्दा उपस्थित करण्यात येत आहे.
2020-21 या आर्थिक वर्षात 45 कोटी मालमत्ता कर वसूल करण्याचे उद्दी÷ महापालिकेने ठेवले आहे. मात्र या उद्दी÷ पूर्तीमध्ये कोरोनाची अडचण निर्माण झाली आहे. त्यामुळे जुलै अखेर पर्यंत 5 टक्के सवलतीची मुदत देवूनही केवळ 19 कोटी 70 लाख रूपये घरपट्टी जमा झाली आहे. उर्वरित 25 कोटी घरपट्टी वसुल करण्यासाठी महापालिकेला प्रयत्न करावे लागणार आहेत. एप्रिल महिन्यात घरपट्टी भरणाऱयांना 5 टक्के सवलत देण्यात येते. मात्र यंदा लॉकडाऊनमुळे मुदत वाढीची मागणी करण्यात आल्याने जुलै अखेर पर्यंत 5 टक्के सवलतीची मुदत वाढविण्यात आली होते. पण आता ही मुदत संपली असून, सध्या विना सवलत व विना दंड घरपट्टी जमा करून घेण्यात येत आहे. ऑगस्ट सप्टेंबर आणि ऑक्टोंबर अखेरपर्यंत घरपट्टी भरणे आवश्यक आहे. अन्यथा दि. 1 नोव्हेंबर पासुन प्रति महिना 2 टक्के दंड आकारणीस प्रारंभ करण्यात येणार आहे.