प्रतिनिधी/ सातारा
जिल्ह्य़ातील अंगणवाडीच्या कित्तेक ईमारती या सुस्थित नाहीत तसेच कित्तेक अंगणवाडय़ा या भाडेतत्त्वार अद्याप चालतात. त्यामुळे या अंगणवाडी शाळेच्या इमारती सुधाराव्यात व अधिकाधीक बालचमु हे अंगणवाडीत शिकण्याकरीता यावीत या उद्देशाने जिल्हय़ात भरीव निधी नुकताच मंजुर झाला आहे. हा निधी नियोजित समितीच्या बैठकीत सर्व आमदारांनी एकमताने आवाज उठविल्याने मंजुर झाला आहे.
यावर्षी नियोजन समितीतुन 18 कोटींचा निधी व अंगणवाडी खोल्यांसाठी 19 कोटी मंजुर झाले आहे. एकुण नियोजित समितीकडुन 37 कोटींची तरतुद करण्यात आली आहे. जिल्हय़ात एकुण 4हजार 810 अंगणवाडी शाळा आहेत. त्यापैकी 1 हजार 697 अंगणवाडी शाळांना स्वतःच्या अशा इमारतीच नाहीत. या शाळा भाडेतत्त्वार सध्या घेण्यात येत आहेत. मागील वर्षी या शाळांच्या इमारतींकरीता 14 कोटींचा निधी मंजुर करण्यात आला होता. त्यामुळे यापुर्वीच मागील वर्षीच काही शाळांच्या इमारतींची दुरूस्ती करण्यात आली होती.
त्यामुळे आता अंगणवाडीच्या ईमारती वाढण्याबरोबरच वर्गखोल्यांची ही दुरूस्ती करण्यात येणार आहे. आता या अंगणवाडी शाळा हायटेक होणार असल्याकारणाणे विद्यार्थ्यांची संख्याही वाढणार आहे. हा निधी पुढील महिन्यात जिल्हा परिषदेकडे वर्ग करण्यात येणार आहे. पहिल्यांदाच इतक्या प्रमाणात निधी जामा झाल्याने सन् 2020-21 मध्ये अधिकाधिक इमारती व खोल्यांची उभारणी होणार आहे.
गेल्या कित्तेक वर्षापासुन खासगी अंगणवाडी शाळांचे जाळे दिवसेंदिवस वाढतच आहे. जिल्हा परिषदेतर्फे चालविण्यात येणाऱया कित्तेक अंगणवाडी शाळेंच्या इमारतींचा दर्जा खालविलेला होता. तसेच कित्तेक इमारती या भाडेतत्त्वावर चालविण्यात येत असल्याने विविध तक्रारींना ही सामोरे जावे लागत होते. त्यामुळे कित्तेक पालक हे आपल्या मुलांना खासगी अंगणवाडीमध्येच दाखल करत होते. पण आता परिस्थिती सुधारणार असुन आता पुन्हा एकदा पालकांचा मोर्चा हा या ‘हायटेक’ अंगणाडीकडे वळणार आहे.