सर्वच कक्षांमध्ये विविध अधिकाऱयांचे कार्यालय, कक्ष रिकामी करणे गरजेचे
प्रतिनिधी /बेळगाव
महापालिका निवडणुका घिसाडघाईने झाल्याने मनपा प्रशासनाची दमछाक झाली होती. ही धावपळ निवडणुकीच्या निकालानंतरदेखील थांबली नाही. महापौर कक्ष वगळता सर्वच कक्षांमध्ये विविध अधिकाऱयांचे कार्यालय थाटण्यात आले आहे. त्यामुळे सर्व कक्ष रिकामी करून नूतनीकरण करण्यासाठी आटापिटा सुरू आहे.
महापालिका सभागृहाची मुदत फेब्रुवारी 2019 मध्ये संपुष्टात आली होती. तब्बल अडीच वर्षांनंतर मनपाची निवडणूक झाली. ही निवडणूक होणार की लांबणीवर पडणार अशा संभ्रमात पार पडली. महापालिका प्रशासनाने तयारी करण्यापूर्वीच राज्य निवडणूक आयोगाने महापालिका निवडणुका जाहीर केल्या. त्यामुळे मनपा प्रशासनाची धावपळ उडाली. मतदारयादी तयार करण्याची सूचना कोरोना कालावधीत करण्यात आली होती. नव्या वॉर्ड पुनर्रचनेनुसार घरोघरी जाऊन मतदारांची माहिती घेऊन यादी तयार करणे आवश्यक होते. मात्र, कोरोनामुळे महापालिकेचा कर्मचारीवर्ग घरोघरी जाऊन मतदारयादी तयार करण्यास सज्ज नव्हता. कोरोना प्रतिबंधक उपाययोजना राबविण्यात मनपाचे अधिकारी व्यस्त होते. त्यामुळे कार्यालयात बसूनच मतदारयाद्या तयार करण्यात आल्या होत्या. परिणामी शेकडो मतदारांची नावे गहाळ झाली होती.
महापालिका सभागृहाची मुदत संपल्यानंतर मुख्य कार्यालयात असलेल्या उपमहापौर कक्षामध्ये कौन्सिल सेपेटरींना बसण्यासाठी चेंबर देण्यात आले आहे. स्थायी समिती बैठक कक्षात निवडणूक मतदान यंत्रे ठेवण्यात आली आहेत. स्थायी समिती अध्यक्षांच्या चेंबरमध्ये सांकेतिक विभागाच्या अधिकाऱयांना बसण्यासाठी सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. आणखी एका चेंबरमध्ये कॉन्सन्ट्रेटर ठेवण्यात आले आहे. सत्ताधारी गटनेत्यांच्या कक्षामध्ये महापालिकेच्या दूरध्वनी संपर्क केंद्राच्या कंट्रोल रूमची स्थापना करण्यात आली आहे. विरोधी गटनेत्यांच्या कक्षांची दुरवस्था झाली आहे. स्थायी समिती चेअरमनच्या कक्षामध्ये मोडके साहित्य ठेवण्यात आले आहे. त्यामुळे महापालिकेच्या नवनिर्वाचित सभागृहातील उपमहापौरांसह स्थायी समिती चेअरमनकरिता चेंबर उपलब्ध करून देणे गरजेचे आहे. पण या ठिकाणी ठेवण्यात आलेले साहित्य व अधिकाऱयांसाठी उपलब्ध करण्यात आलेले कक्ष रिकामी करणे गरजेचे आहे.
महापालिका मुख्य कार्यालय आवारात प्रशासकीय इमारतीचे बांधकाम पूर्ण झाले असून अद्याप या इमारतीचे उद्घाटन झाले नाही. त्यामुळे या इमारतीमध्ये कक्ष उपलब्ध करून देणे अशक्मय आहे. परिणामी जुन्या इमारतीमधील विविध चेंबरमधील साहित्य हटवून तसेच अधिकाऱयांना अन्य ठिकाणी बसण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी मनपाच्या अधिकाऱयांची धावपळ सुरू आहे. कक्षांचे नूतनीकरण करणेदेखील आवश्यक असल्याने याबाबत इमारत देखभाल विभागाला सूचना करण्यात आल्या आहेत. त्याचप्रमाणे उपमहापौरांचे वाहन मनपाचे महसूल उपायुक्त एस. बी. दोड्डगौडर वापरत आहेत. त्यामुळे सदर वाहन आणि महापौरांचे वाहनदेखील महापौर-उपमहापौर निवडणुकीपूर्वी सज्ज ठेवावे लागणार आहे. याकरिता मनपा अधिकाऱयांचा आटापिटा सुरू आहे.