राज्यात 30 ठिकाणी विक्री केंद्रे.
एसटीचे पीआरओ अभिजीत भोसले यांची माहिती.
एसटीचे उत्पादन वाढविण्यासाठी करावी लागतेय कसरत.
पेट्रोल-डिझेल, सीएनजी, एलपीजीही खरेदी करता येणार.
अजय कांडर / कणकवली:
कोरोनाने सगळय़ाच व्यवसायांना तोटय़ात आणले आहे. एसटी वाहतूक टप्पा झाल्याने एसटी महामंडळाला करोडो रुपयांचा तोटा सहन करावा लागला आहे. यामुळे एसटी महामंडळाने नुकतीच मालवाहतूक सुरू केली. त्याला चांगला प्रतिसाद मिळाल्यानंतर आता महामंडळाने खासगी वाहनांसाठी एसटीचे पेट्रोल पंप उभारण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यात 30 ठिकाणी पेट्रोल, डिझेल, सीएनजी आणि एलपीजी केंद्रे उभारण्यात येणार असल्याची माहिती एसटी महामंडळाचे पीआरओ अभिजीत भोसले यांनी ‘तरुण भारत’शी बोलताना दिली.
नव्या सरकारच्या प्रारंभापासूनच एसटीचे उत्पादन कसे वाढेल, यासाठी प्रारंभ करण्यात आला होता. परिवहनमंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष अनिल परब यांनी याबाबत प्रारंभी एसटीच्या वरिष्ठ अधिकाऱयांची बैठक घेऊन चर्चाही केली होती. मात्र, कोरोनामुळे एसटीच्या एकूण उत्पन्नावरच मर्यादा आल्या. त्यामुळे आता एसटीचा तोटा भरून काढण्यासाठी विविध उपाययोजना राबविण्यात येत आहेत. त्यातच मर्यादित इंधन पंपामुळे पेट्रोल-डिझेल, सीएनजी आणि एलपीजी भरण्यासाठी लांबच लांब रांगेत अडकावे लागते. त्यामुळे आता या रांगेतून लवकरच सुटका होण्यासाठी राज्यातील विविध ठिकाणी इंधन विक्री सुरू करण्याचा निर्णय एसटी महामंडळाने घेतला आहे. यामुळे सर्वसामान्य नागरिकांनाही एसटीच्या इंधन पंपावर आता पेट्रोल-डिझेल सीएनजी, एलपीजी खरेदीही करता येणार आहे.
रत्नागिरीत दोन विक्री केंद्रे
दरम्यान, एसटी महामंडळाच्या अधिकाऱयांबरोबर परिवहनमंत्र्यांची बैठक झाल्यावर एसटी पंपावर विक्री केंद्र उभारण्यासाठी इंडियन ऑइल कंपनीसोबत करार करण्याचा निर्णय घेण्यात आला. यासाठी पेट्रोल-डिझेल, सीएनजी-एलपीजी विक्रीसाठी बीडमध्ये चार, तर नाशिकमध्ये तीन केंदे उभारण्यात येणार आहेत. पालघर, जळगाव, बुलढाणा, रत्नागिरी, अकोला, वर्धा आणि सोलापूर येथे प्रत्येकी दोन आणि पुणे, यवतमाळ, गडचिरोली, अमरावती, अहमदनगर, सातारा, धुळे, जालना, औरंगाबाद येथे प्रत्येकी एक केंद्र उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
काही ठिकाणी नव्याने केंद्राची उभारणी
यासाठी महामंडळाची जागा भाडेतत्त्वावर देऊन काही ठिकाणी नव्याने केंद्राची उभारणी करण्यात येईल, तर काही केंद्राची पुनर्बांधणी करण्यात येईल. पहिल्या टप्प्यात पेट्रोल-डिझेल विक्री सुरू होईल. त्यानंतर लगोलग सीएनजी आणि शेवटच्या टप्प्यात एलपीजी विक्री सुरू करण्यात येईल. या सर्व केंद्रांवर वाहनधारकांना इंधन भरण्याची मुभा असेल.
उत्पन्नाचे स्त्राsत वाढविण्यासाठी प्राधान्य
लॉकडाऊन काळात झालेले नुकसान भरून काढणे व एसटी महामंडळाच्या उत्पन्नाचे स्त्राsत वाढविण्यासाठी विविध उपाययोजना यावर काम सुरू आहे. त्यानुसार एसटीच्या जागा भाडे करारावर देत एसटी पंपावर किरकोळ विक्री केंद्रे सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासाठी परिवहनमंत्री व एसटी महामंडळाचे अध्यक्ष अनिल परब हे सकारात्मक असल्याचे सांगण्यात येत आहे.
पर्यायी उत्पन्नाचे मार्ग शोधण्यास प्रारंभ
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर एसटीच्या उत्पन्नाचा मुख्य स्त्राsत असलेल्या प्रवासी तिकिटातून मिळणाऱया हजारो कोटीच्या उत्पन्नाला सध्या एसटीला मुकावे लागत आहे. अशा परिस्थितीत एसटीने पर्यायी उत्पन्नाचे मार्ग शोधण्यास सुरुवात केली आहे. यात नुकतीच मालवाहतूक सुरू केली. त्यात उन्हाळय़ामध्ये हापूस आंबा वाहतुकीसाठी बागायतदारांकडूनही चांगला प्रतिसाद मिळाला. एसटी मालवाहक ट्रकमधून स्थानिक मालवाहतूकही करण्याला प्रारंभ झाला आहे. त्यालाही चांगला प्रतिसाद मिळाल्यानंतर आता महामंडळाने खासगी वाहन चालकांसाठी एसटी महामंडळाचे पेट्रोल पंप खुले करण्याचा निर्णय घेतला आहे.
ग्राहकांना अनेक पर्याय
एसटी महामंडळाने राज्याच्या विविध भागांत पेट्रोल, डिझेल, सीएनजी, एलपीजी केंद्रे उभारण्याचा निर्णय घेतल्याने वाहनधारकांना पेट्रोल, डिझेल भरण्यासाठी अनेक पर्याय उपलब्ध होणार आहेत. मात्र, एसटी महामंडळाचे ही खासगीकरण्याचा दिशेने वाटचाल सुरू नाही ना? असाही सवाल उपस्थित होत आहे.