आपल्याकडं बख्खळ पैसा असावा असं प्रत्येकाला वाटणं स्वाभाविकच आहे. अनेकजण त्यासाठी सर्वात सुरक्षित मानला गेलेला बचतीचा मार्ग चोखाळतात. पण अलिकडचा कल बघितला तर बचत केलेल्या पैशाची गुंतवणूक मोठय़ा प्रमाणात केली जाते, असं दिसून येतं. विशेषतः 22 ते 32 या वयोगटातील तरूणांमध्ये हा कल अधिक प्रमाणात दिसून येतो. गुंतवणुकीची अनेक साधनं उपलब्ध आहेत. त्यांपैकी अनेकांची माहिती अनेकांना असतेच. मात्र, ऑन लाईन ट्रेडिंग, अर्थात संगणकाच्या माध्यमातून समभाग, वस्तूबाजार किंवा तत्सम साधनांमध्ये पैसे गुंतवणं हा मार्ग अधिक प्रमाणात उपयोगात आणला जातो, असं दिसतं.
अर्थात यासाठी अनेक कंपन्यांच्या आर्थिक परिस्थितीचा सखोल अभ्यास असणं अत्यावश्यक आहे. तो करण्यासाठी दिवसाकाठी काही वेळ तरी त्याला द्यावा लागतो. शिवाय नोंदी ठेवाव्या लागतात. कंपन्यांचे वार्षिक अहवाल वाचावे लागतात. हे सर्व करण्यासाठी योग्य दिशा आणि मार्गदर्शनाची आवश्यकता असते. अशा प्रकारे गुंतवणूकदारांची माहिती क्षमता वाढविण्यासाठी एक नवा ऑन लाईन प्लॅटफॉर्म उपलब्ध करून देण्यात आला आहे. त्याचं नाव टज्डज्डज् असं आहे. एक एक प्रकारचं ऍप आहे. जे आपल्याला ऑन लाईन ट्रेडिंगसाठी अतिशय सोयीचं आहे असं खात्रीपूर्वक सांगितलं जातं. ऑन लाईन ट्रेडिंग करणाऱयांना घरबसल्या प्रशिक्षण मिळण्यासाठी तो उपयुक्त आहे, असं अनेकांचं मत आहे. यामुळं काही सोपी पावलं उचलून आपण घरबसल्या ऑन लाईन ट्रेडींगला सज्ज होऊ शकता. ते योग्य प्रकारे आणि जागरूकपणानं केलं तर आपल्या अतिरिक्त उत्पन्नाचा तो एक विश्वासार्ह स्रोत होऊ शकतो, असं मत तज्ञांनी व्यक्त केलं आहे.