गोकुळचा दर्जेदार उत्पादनांना ग्राहकांची पसंती – चेअरमन विश्वास पाटील
प्रतिनिधी / कोल्हापूर
मुंबई, पुणे, कोल्हापूर, कोकण, गोवा व अन्य शहरांमधील चोखंदळ ग्राहकांना उच्चतम गुणवत्तेचे दूध व दुग्धजन्य पदार्थांचा पुरवठा करून दृढ विश्वास निर्माण केलेले गोकुळने श्रावण सोमवारच्या शुभ मुहूर्तावर बासुंदीचे नवीन उत्पादन घेऊन ग्राहकांच्या सेवेत दाखल होत आहे. गोकुळ प्रकल्प येथे चेअरमन विश्वास पाटील हस्ते उत्पादनाचा प्रारंभ करण्यात आला. यावेळी संचालक तसेच अधिकारी उपस्थित होते.
सध्या बाजारामध्ये गोकुळ फूल क्रीम व गाय दूधाची विक्री कोल्हापूर, पुणे, मुंबई, सिंधुदूर्ग, रत्नागिरी, सांगली, बेळगांव, गोवा या ठिकाणी दररोज अंदाजे 13 लाख लिटर्सपर्यंत केली जात आहे. गोकुळच्या गुणवत्तेवर ग्राहकांचा प्रचंड विश्वास असल्याने गोकुळ दूधाबरोबर गोकुळचे दुग्धजन्य पदार्थ तूप, श्रीखंड, टेबल बटर, कुकींग बटर, पनीर, लस्सी, दही, ताक, टेट्रा पॅक दूध या पदार्थांना मोठ्या प्रमाणात मागणी आहे. गेल्या काही काळापासून ग्राहकांची मागणी लक्षात घेऊन संघाने `गोकुळ बासुंदी” उत्पादन घेऊन विक्रीसाठी उपलब्ध करून देणेचा निर्णय संचालक मंडळानेघेतला होता. सोमवारी गोकुळच्या बासुंदीचे लॉंचिंग करण्यात आले.
सुरुवातीच्या काळात बासुंदी 250 ग्रॅम व 500 ग्रॅम अशा आकर्षक पॅकिंगमध्ये उपलब्ध केली आहे तसेच अंजीर, सीताफळ, बटरस्कॉच व इतर सर्व फ्लेवर मध्ये लवकरात लवकर उपलब्ध होणार आहे. ग्राहकांच्या मागणीनुसार भविष्यात 1 किलोच्या पॅकिंगमध्ये उपलब्ध करून देणेचे नियोजन केले आहे. सध्या सणासुदीचे दिवस सुरु असलेने ग्राहकांना गोकुळच्या बासुंदीची चव निश्चितच आवडेल सदरची बासुंदी वितरकांबरोबरच मोठ्या शहरांमधील मुख्य मॉलमध्ये उपलब्ध करून देणेत येणार आहे. बासुंदी उत्पादनामुळे संघाकडे अतिरिक्त ठरणाऱ्या दूधाची काही प्रमाणात निर्गत लावणे शक्य होणार असल्याचे संघाचे चेअरमन विश्वास पाटील यांनी सांगितले.
बासुंदी बरोबर टेट्रा पॅक मधील विविध फ्लेवर मिल्क व ताक हे नविन उत्पादन पण ग्राहकांना भविष्यात उपलब्ध करून देणार आहोत व ग्राहक तेवढ्याच विश्वासाने खरेदी करुन गोकुळची हि नवीन उत्पादने ग्राहकांच्या मनात स्थान निर्माण करुन देतील अशी पाटील यांनी व्यक्त केली.
यावेळी जेष्ठ संचालक अरूण डोंगळे, संचालक नविद मुश्रीफ, अजित नरके, शशिकांत पाटीलचुयेकर, बाबासाहेब चौगले, किसन चौगले, रणजितसिंह पाटील, , संभाजी पाटील, प्रकाश पाटील, बाळासो खाडे, अंबरिषसिंह घाटगे, , संचालिका श्रीमती अंजना रेडेकर, कार्यकारी संचालक डी. व्ही. घाणेकर, बोर्ड सेक्रटरी एस. एम. पाटील, मार्केटींग व्यवस्थापक हनमंत पाटील इतर अधिकारी व कर्मचारी आदि उपस्थित होते.