या प्रमाणपत्राशिवाय पेन्शन नाही, सरकारचा नियम
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
आपण जिवंत आहोत याचे प्रमाणपत्र सादर केल्याशिवाय पेन्शन (निवृत्तीवेतन) मिळणार नाही, असे केंद्र सरकारने घोषित केले आहे. त्यामुळे विशिष्ट वेळेत प्रत्येक निवृत्तीवेतन धारकाला जीवन प्रमाणपत्र सादर करावे लागणार आहे. नव्या सोयीनुसार हे प्रमाण पत्र ऑनलाईन बनविले जाऊ शकते.
सध्याच्या नियमानुसार जीवन प्रमाणपत्रासाठी प्रत्येक पेन्शन धारकाला बँकेत प्रत्यक्ष उपस्थित रहावे लागते. जास्त वय झालेल्या आणि विकलांग अवस्थेत असणाऱया पेन्शनधारकांना बँकेत उपस्थित राहणे कित्येकदा अशक्य असते. ते उपस्थित राहिले नाहीत, तर त्यांना हे वेतन मिळण्यात अडचणी येऊ शकतात.
डिजिटल प्रमाणपत्राची सुविधा
या अडचणी ओळखून केंद्र सरकारने आता ऑनलाईन जीवन प्रमाणपत्राची सुविधा निर्माण केली आहे. हे प्रमाणपत्र पेन्शन धारक स्वतः घरबसल्या तयार करु शकतो. तसेच ते बँकेत ऑनलाईन जमा केले जाऊ शकते. ‘जीवन प्रमाणपत्र’ या अधिकृत वेबसाईटवर जाऊन हे प्रमाणपत्र तयार केले जाऊ शकते. या वेबसाईटचा लाभ केंद्र आणि राज्य सरकार यापैकी कोणाचीही पेन्शन घेणाऱयांना घेता येतो.
आधार क्रमांकाशी संलग्न व्यवस्था
डिजिटल जीवन प्रमाणपत्र ही आधार क्रमांकाशी संलग्न व्यवस्था आहे. या प्रमाणपत्रा बायोमेट्रिक ऑथेंटिकेशन व्यवस्था करण्यात आली आहे. कोणत्याही सरकारी कार्यालयात खेटे न घालता हे प्रमाणपत्र घरातच तयार करण्याच्या सोयीमाळे कोटय़वधी पेन्शनधारकांना लाभ होणार आहे.
बॉक्स
कशी आहे प्रक्रिया
ड जीवन प्रमाण पत्र वेबसाईटवर क्लिक केल्यावर होम पेज खुले होईल
ड होम पेजवरील गेट अ सर्टिफिकेट या लिंकवर क्लिक करावे लागेल
ड आपल्यासमोर तीन पर्याय येतील, काँप्युटर, मोबाईल आणि ऑफिस
ड यापैकी आपल्याला सोयीच्या पर्यायावर आपण क्लिक करावे लागेल
ड एक पर्याय क्लिक केल्यावर डाऊनलोड अप्लिकेशन, पर्याय दिसतील
ड डाऊनलोड करण्यासाठी ईमेल पत्ता किंवा कॅपचा कोड भरावा लागेल
ड यानंतर आपल्या ईमेलवर एक सहा आकडी कोड क्रमांक दिसू लागेल
ड हा क्रमांक भरल्यानंतर ऍप्लीकेशन डाऊनलोड पर्याय दिसू लागेल
ड ऍप्लिकेशन समोर आल्यानंतर त्यात विचारलेली सर्व माहिती भरावी
ड यानंतर ऍपच्या माध्यमातून आपला आधार क्रमांक अथोराईज होईल
ड यानंतर आपल्याला पीडीएफ फॉमँटमध्ये प्रमाणपत्र पर्याय दिसतील
ड यापैकी एका पर्यायावर आपल्याला क्लिक करावे लागणार आहे
ड यानंतर आपले जीवन प्रमाणपत्र आपल्याकडे डाऊनलोड होईल