प्रत्येकाच्या घरात पैसा ठेवायची एक निश्चित जागा असते. जास्तकरून लोक आपल्या पैशांना सुरक्षित ठेवण्यासाठी कपाट किंवा तिजोरीचा वापर करतात. बऱयाच वेळा असे देखील होते की, लोकांची इन्कम तर चांगली असते पर त्यांना नेहमी आर्थिक अडचण जाणवत असते.
याचे मुख्य कारण घरातील कपाट किंवा तिजोरी. या कपाट आणि तिजोरीला जर चुकीच्या दिशेत ठेवले तर नक्कीच नुकसान होण्याची शक्मयता असते. जर कपाट किंवा तिजोरीला योग्य जागेवर किंवा योग्य दिशेत ठेवले तर व्यक्तीला कधीही धनहानी होत नाही. पैशांचे नवनवीन स्रोत देखील बनू लागतात. घर किंवा दुकानात कपाट आणि तिजोरी ठेवताना या गोष्टींकडे लक्ष देणे फारच गरजेचे आहे.
कपाट किंवा तिजोरीचे तोंड दाराकडे नसावे. याने तिजोरीत धन थांबत नाही आणि वायफळ खर्च जास्त होतात.
कपाट किंवा तिजोरीचे तोंड दक्षिण दिशेकडे उघडणारे नसावे. तसेच या दिशेत कपाटात रुपये ठेवण्यापासून देखील स्वतःचा बचाव करायला पाहिजे.
कपाट किंवा तिजोरी जमिनीच्या थोडी उंचीवर ठेवावी. यासाठी लाकडाचे पाट किंवा स्टेण्डचा वापर करावा.
कपाटाच्या खाली रोज सफाई केली पाहिजे. लक्ष्मी नेहमी स्वच्छ जागेवर राहणे पसंत करते.
कपाटाचा रंग गडद लाल किंवा हिरवा नको.
कपाटाला उत्तर पूर्व दिशेत ठेऊ नये. कपाट ठेवण्याची योग्य दिशा
दक्षिण, दक्षिण-पश्चिम आणि पश्चिम दिशा मानण्यात आली आहे.
सर्वात महत्त्वाचे म्हणजे कपाट किंवा तिजोरीला कधीही रिकामे ठेवू नये. यात लक्ष्मी-गणेश किंवा विष्णूचे फोटो ठेवल्याने बरकत होते.
कपाटावर कधीही काच लावू नये आणि जर लावला असेल तर त्याला हिरव्या कपडय़ाने झाकून ठेवावे.
नीता रवींद्र कामत