वाढती रुग्णसंख्या लक्षात घेऊन आरोग्य विभागाचे नियोजन
प्रतिनिधी बेळगाव
कोरोनाबाधितांची वाढती रुग्णसंख्या लक्षात घेऊन सरकारी इस्पितळांबरोबरच तालुका पातळीवरील खासगी इस्पितळात उपचार मिळविण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. आरोग्य विभागाने यासाठी पुढाकार घेतला असून खासगी डॉक्टरांची बैठक घेऊन चर्चा करण्यात आली आहे.
सध्या बेळगाव येथील सिव्हिल हॉस्पिटल हे पूर्णपणे कोरोनाबाधितांवर उपचारासाठी राखीव ठेवण्यात आले आहे. याबरोबरच नऊ खासगी इस्पितळातही कोरोनाबाधितांवर उपचार सुरू आहेत. तरीही सर्वसामान्य रुग्णांवर वेळेत उपचार मिळेनात, अशी परिस्थिती आहे. ही परिस्थिती लक्षात घेऊन तालुका पातळीवरील खासगी इस्पितळात कोरोनाबाधितांवर उपचार सुरू करण्यासाठी प्रयत्न सुरू झाले आहेत.