इस्लामाबाद / वृत्तसंस्था
जम्मू काश्मीरमध्ये हवाई तळावर ‘ड्रोन’द्वारे झालेल्या हल्ल्यानंतर आजुबाजूच्या परिसरातही चारवेळा ‘ड्रोन’चा संचार सुरू असल्याचे प्रकार गेल्या आठवडाभरात निदर्शनास आले आहेत. त्यापाठोपाठ आता पाकिस्तानची राजधानी इस्लामाबाद येथील भारतीय दुतावासावरही ड्रोनद्वारे नजर ठेवली जात असल्याचे स्पष्ट झाले आहे. सदर ड्रोन उच्चायुक्तालयात चालू असलेल्या हालचालींवर नजर ठेवत गोपनीय माहिती गोळा करण्याचा प्रयत्न करीत असल्याचे सांगण्यात येत आहे. भारताने याबाबत आक्षेप नोंदवत सुरक्षा बिघडल्याचा मुद्दा पाकिस्तानकडे उपस्थित केला आहे.