बेळगाव/ प्रतिनिधी
इंग्रजी भाषेत घेण्यात येणारी कवायत (परेड) यापुढे फक्त कानडी भाषेतूनच घेण्यात यावी, असा फतवा कर्नाटक राज्य शासनाने नुकताच काढला आहे. याची काटेकोरपणे अंमलबजावणी करून सीमावर्ती भागातील बेळगाव जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातही विशेष अंमलात आणावी, असे आदेशात म्हटले आहे.
बेळगाव जिल्ह्यासह राज्यात दिवसेंदिवस कन्नड भाषेची सक्ती तीव्र केली जात आहे. कन्नडला प्रथम प्राधान्य देण्यासाठी सरकार सर्व विभागात बदल करत असुन पोलिस प्रशासनात सुद्धा ते होताना दिसत आहे. सर्व सरकारी कार्यालयात कन्नड भाषेतूनच व्यवहार केले जावेत यासाठी सातत्याने खटाटोप सुरू ठेवण्यात आले आहेत
कर्नाटकात कन्नड भाषेमध्ये पोलिस कवायत घेण्यात यावी, असा प्रस्ताव बेळगावचे तत्कालीन जिल्हा पोलिस प्रमुख डॉ. बी.आर.रविकांतेगौडा गृह खात्याकडे पाठवला होता. यावर आता अंमलबजावणी होणार असुन यापुढे कवायत (परेड) फक्त कानडी भाषेतूनच घेतली जाईल.