मूळ फेसबुकच्या रचनेत कोणताही बदल नाही – नव्याने नाव दिल्याचे झुकरबर्ग यांचे स्पष्टीकरण
वृत्तसंस्था/ कॅलिफोर्निया
सोशल मीडियावर सर्वाधिक पसंतीचा प्लॅटफॉर्म म्हणून सर्वांच्या परिचयाचा असणारा फेसबुक इंक यांच्याकडून आपले नाव बदलून मेटा करण्यात आले आहे. सदरच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरला यापुढे मेटा नावाने ओळखले जाणार आहे.
यामुळे मार्क झुकरबर्ग यांच्या सहयोगी कंपनीचे नाव बदलून मेटा केले आहे. फेसबुकच्या अंतर्गत येणारे फेसबुक, व्हॉटसऍप आणि इंस्टाग्राम ही नावे आहे तीच राहणार आहेत. यामध्ये जरी नाव बदलले तरी कोणत्याही प्रकारे आमच्या ध्येयामध्ये बदल केला जाणार नसल्याचे स्पष्ट केले आहे.
कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी मार्क झुकरबर्ग यांनी गुरुवारी ऑकलंडमधील आयोजित वार्षिक सभेत फेसबुक आता मेटा नावाने ओळखले जाणार असल्याची घोषणा केली आहे. भविष्यातील व्हर्चुअल रियलिटी व्हिजन प्राप्त करण्यासाठी आम्ही स्वतःहे रिब्रँडींग करणार असल्याने फेसबुक आहे तिथेच राहणार आहे.
डिसेंबरपासून नव्या नावाने ट्रेडिंग होणार
कंपनीच्या समभागांमध्ये एक डिसेंबरपासून फेसबुकच्या व्यतिरिक्त मेटा प्लॅटफॉर्म इंक सिंबलमधून ट्रेडिंग सुरु होणार आहे. झुकरबर्ग यांनी म्हटले आहे, की मेटा हा ग्रीक शब्द बियॉनडमधून आला आहे.
बदलाची ही तर सुरुवात….
आम्ही निश्चित केलेल्या ध्येयाची ही एक झलक आहे. अजून संपूर्ण पिक्चर बाकी असल्याचे स्पष्टीकरण मार्क झुकरबर्ग यांनी यावेळी दिले आहे. जुना ब्रँड हा आमची संपूर्ण ओळख करुन देण्यात कमी पडला असेल, परंतु ग्राहकांना पुन्हा नव्याने जोडण्यासाठी आम्ही व्युहरचना आखणार असून त्याचे पडसाद आगामी काळात आपणास पहावयास मिळणार असल्याचेही मार्क झुकरबर्ग यांनी म्हटले आहे.
मेटावर्स काय आहे?
मेटावर्स एक प्रकारचे आभासी जग राहणार आहे, या तंत्रज्ञानावर ग्राहकांची व्हर्चुअल ओळख निर्माण होणार असून यातून एक डिजिटल वर्ल्डमध्ये प्रवेश करणार आहे. म्हणजे एक समांतर जग, ज्यामध्ये आपली वेगळी ओळख निर्माण होणार आहे.