ऑनलाईन टीम / मुंबई :
एकतर्फी प्रेमातून एका तरुणाने वर्ध्यातील हिंगणघाटात शिक्षिकेला पेट्रोल टाकून जिवंत जाळण्याचा धक्कादायक प्रकार घडला. या घटनेमुळे सर्वत्र संताप व्यक्त होत आहे. या घटनेवर खासदार छत्रपती संभाजीराजे भोसले यांनीही फेसबुक पोस्टद्वारे आपला संताप व्यक्त केला आहे.
ते आपल्या फेसबुक पोस्टमध्ये म्हटले, हा प्रुरतेचा कळस झाला. हे जरा अतीच होत आहे. ‘आता बस्स, सहनशीलतेचा कडेलोट होत आहे. महाराष्ट्र कोणत्या दिशेला वाटचाल करत आहे? असा सवाल खासदार संभाजीराजे भोसले यांनी विचारला आहे. तसेच, महाराष्ट्र पोलिसांनी हैदराबाद पोलिसांचा आदर्श घ्यावा असंही ते म्हणाले.
दरम्यान, हैदराबादमध्ये काही दिवसांपूर्वी बलात्काराच्या आरोपींचा एनकाउंटरमध्ये खात्मा करण्यात आला होता.