पाच महिन्यांपूर्वी निधन झालेल्या व्यक्तीच्या नावे पैशांची मागणी
प्रतिनिधी / बेळगाव
तंत्रज्ञानाच्या युगात काहीही शक्मय आहे. येथे मृत व्यक्ती तंत्रज्ञानाच्या माध्यमातून अनेक महिने, अनेक वर्षे जिवंत राहते. याचा प्रत्यय सध्या बेळगावात येतो आहे. गेल्या काही महिन्यांपूर्वी निधन झालेल्या व्यक्तींच्या नावे फेसबुकवर फ्रेंड रिक्वेस्ट येऊ लागल्या आहेत. त्यांच्या मित्रांची आर्थिक फसवणूक करण्यासाठी हा प्रकार करण्यात येत आहे.
बुधवारी सकाळपासून डी. एल. कुलकर्णी या कंत्राटदाराच्या नावे फेसबुकवर अनेकांना फ्रेंड रिक्वेस्ट आली. द्यामनगौडा कुलकर्णी या नावाने सुरू करण्यात आलेल्या फेसबुक अकाऊंटवरून आलेली रिक्वेस्ट स्वीकारल्यानंतर खरा खेळ सुरू झाला. त्यांच्या मित्रांच्या मेसेंजरवर ‘हाय’ म्हणून मेसेज सुरू झाले. ‘कसे आहात?, कुठे आहात?’ अशी विचारणा होऊ लागली.
थोडय़ाच वेळात तुमचा ‘गुगल पे किंवा फोन पे आहे का?’ अशी विचारणा होऊ लागली. ‘आहे’ असे उत्तर देताच ‘मला तातडीने दहा हजार रुपयांची गरज आहे. सकाळी 10 नंतर बँक सुरू झाल्यावर तुम्हाला पैसे परत करतो. तुम्ही सध्या 8697097267 या आपल्या मित्राच्या खात्यावर गुगल पे करा’ अशा विनंतीचे मेसेज सुरू झाले.
25 हून अधिक जणांना मेसेज
बुधवारी सकाळपासून 25 हून अधिक जणांना डी. एल. कुलकर्णी यांच्या नावे मेसेज आले आहेत. प्रत्यक्षात 18 मे 2021 रोजी त्यांचे निधन झाले. ते टी.व्ही. सेंटर येथील रहिवासी होते. प्रथितयश कंत्राटदार होते. जिल्हा कंत्राटदार संघटनेचे अध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम केले आहे. पाच महिन्यांपूर्वी निधन झालेल्या व्यक्तीच्या नावे फ्रेंड रिक्वेस्ट पाठवून पैसे उकळण्याचा प्रयत्न सुरू झाला
आहे. अनेकांनी ‘पाच महिन्यांपूर्वीच त्यांचे निधन झाले. आता तुम्ही कुठून उगवलात?’ असा प्रश्न उपस्थित केल्यानंतर सायबर गुन्हेगारीत मुरलेल्या गुन्हेगारांनी दुसरे गिऱहाईक शोधणे सुरू केले
आहेत.