कुपवाडमध्ये भाजपातर्फे साखर वाटप
कुपवाड / प्रतिनिधी
संपूर्ण देशाचे लक्ष लागलेल्या उत्तरप्रदेश, गोवा, मणिपूर आणि उत्तराखंड या चार राज्यांत भारतीय जनता पक्षाचा दणदणीत विजय झाला. या यशाबद्दल गुरुवारी कुपवाडमध्ये नगरसेवक प्रकाश ढंग यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजी, जल्लोष व साखर, पेढ़े वाटप करून आनंदोत्सव साजरा केला.
आता आगामी सांगली मिरज कुपवाड महापालिकेच्या निवडणुकीतही भाजपचा पुन्हा झेंडा फडकेल, असा विश्वास प्रकार ढंग यांनी यावेळी व्यक्त केला. यावेळी भाजपाचे विश्वजीत पाटील, शहराध्यक्ष रवींद्र सदामते, कृष्णा राठोड, महेंद्र पाटील, दादासाहेब रुपनर, गजानन पाटील, प्रकाश पाटील, सुरज पाटील, बाळासाहेब पाटील यासह अन्य पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी होते.