वृत्तसंस्था / मुंबई
देशातील श्रीमंताच्या यादीत मागील काही वर्षांपासून आपले स्थान कायम सर्वोच्च राखत आलेले रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी आणि त्यांचे कुटुंबीय यांना कोणी ओळखत नाही असे नाही. तसेच त्यांच्या कुटुंबाचे राहणीमान व ते वापरत असणाऱया गोष्टीविषय नेहमीच समाजात चर्चेचा विषय बनत असतो. सध्या नवीन माहितीनुसार मुकेश अंबानी यांच्या पत्नी आणि तीन मुलांसह एक अन्य प्रमोटर कंपनीचे काही समभाग समभाग खरेदी करुन रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये आपली हिस्सेदारी वाढविण्यासाठी प्रयत्न करणार आहेत. सप्ताहातील शेवटच्या दिवसात शुक्रवारी शेअर बाजारातील व्यवहार सुरु झाल्यानंतर काही वेळ रिलायन्सचे समभाग नुकसानीत राहिले होते. परंतु नंतर कंपनीचे समभाग 4 टक्क्यांनी वधारले आहेत.
कंपनीचे समभाग बाजारातील मिळालेल्या माहितीनुसार प्रारंभ तेल व्यवसाय ते सध्याचा दूरसंचार व्यवसायातील प्रारंभापासून रिलायन्सची वाटचाल सुरु आहे. आता रिलायन्स इंडस्ट्रीजमधील प्रमोटर ग्रुपची हिस्सेदारी 47.45 टक्के बनली आहे.
या व्यवहारानंतर रिलायन्समधील मुकेश अंबानी यांची हिस्सेदारी 0.11 टक्के (72.31 लाख समभाग) वाढून 0.12 टक्के(75 लाख समभाग) झाले आहेत. याप्रकारे कंपनीत त्यांची पत्नी नीता अंबानी यांची हिस्सेदारी 67.96 लाख वाढून 75 लाख झाली आहे. त्यांचा मुलगा आकाश आणि मुलगी यांची हिस्सेदारी 67.2 लाखाने समभाग वाढून 75 लाख समभागावर पोहोचली आहे. तर तिसरा मुलगा अनंत यांची हिस्सेदारी 2 लाखाने वाढून 75 लाख समभागांवर पोहोचला आहे.