नवी दिल्ली/प्रतिनिधी
कोरोनाची पहिली आणि दुसरी लाट इतकी भयंकर होती की यामध्ये अनेक नागरिकांचा मृत्यू झाला. तर कोरोनाच्या पहिल्या लाटेत कोरोना रुग्णांची संख्या वाढत असताना अनेक देश लस शोधण्यात व्यस्त होते. अखेरकाही देशांना लस संशोधनात यश मिळाले आणि संपूर्ण जगाला दिलासा मिळाला. लसीचे उत्पान सुरु झाले आणि कोरोनापासून बचावासाठी नागरिकांना लसीकरण केले जाऊ लागेल. कोरोनावर मात करण्याचासाठी प्रतिबंधात्मक लस नागरीकांना देण्यात आली. पण सुरूवातीला ही लस ६० वर्षांवरील व्यक्तींना देण्यात आली. त्यानंतर ४५ वर्षांवरील नागरिकांना लस देण्यास सरकारने परवानगी दिली. यानंतर १८ वर्षांवरील तरूणांना लस देण्यास मंजूरी दिली. आता २ ते १८ वय वर्ष गटातील मुलांना लस देण्यास परवानगी दिली आहे. त्यामुळे अनेक दिवसांपासून लागून राहिलेली प्रतीक्षा आता संपली आहे.
२ ते १८ वर्षांच्या मुलांवर कोरोलना लशीची चाचणी करण्याची परवानगी भारत बायोटेकला देण्यात आली आहे असं वृत्त पीटीआयने दिले होते. लहान मुलांवर दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यातील चाचणी करण्याची परवानगी भारत बायोटेकला देण्यात आल्याचं पीटीआयने सांगितले होते. देशातील विविध ठिकाणी एकूण ५२५ लहान मुलांवर ही चाचणी करण्यात आली.
२ ते १८ वर्षांच्या मुलांवर कोरोना लशीची चाचणी करण्याची परवानगी भारत बायोटेकला देण्यात आली आहे असं वृत्त पीटीआयने दिले होते. लहान मुलांवर दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यातील चाचणी करण्याची परवानगी भारत बायोटेकला देण्यात आल्याचं पीटीआयने सांगितले होते. देशातील विविध ठिकाणी एकूण 525 लहान मुलांवर ही चाचणी करण्यात आली.
लहान मुलांच्या लसीकरणाबाबत अत्यंत महत्त्वाचे मुद्दे
2 ते 18 वयोगटासाठी कोव्हॅक्सिन लसीला मंजुरी
मुलांच्या लसीकरणाला DCGIची परवानगी
मुलांच्या लसीकरणाचा मार्ग मोकळा