ऑनलाईन टीम/तरुण भारत
कोरोनावर मात करण्यासाठी लसीकरण हा एकमात्र उपाय असल्याचं आतापर्यंत बोललं जात होत. पण आता कोरोना संसर्गापासून एक च्युईंग गम लोकांचा बचाव करु शकतं असा दावा वैज्ञानिकांनी केलाय. एका अभ्यासानुसार हे च्युईंग गम एखाद्या जाळीप्रमाणे काम करतं, असं म्हंटलं आहे.
दरम्यान, जाळीच्या मदतीने ज्यापद्धतीने एखादी गोष्टी पकडतात त्याच पद्धतीने हे च्युईंग गम कोरोना पार्टिकल्स पकडेल. या च्युईंग गमच्या मदतीने थुंकीमधील कोरोना पार्टिकल्सचं प्रमाण नियंत्रणात ठेवण्यास मदत होणार आहे. असं केल्याने कोरोनाचा संसर्ग होण्यापासून वाचवता येऊ शकतो, असे म्हंटले आहे.