प्रतिनिधी / सोलापूर
विजापूर रोडवरील संभाजी महाराज तलाव येथे एका विवाहित महिला आपल्या दोन लहान लेकरांसह आत्महत्या करण्याच्या उद्देशाने तलावात उडी मारली होती. तेव्हा प्रसंगावधान राखून त्या तीन्हींचा जीव वाचवल्याबद्दल दिनेश जाधव यांचा संभाजी ब्रिगेड सोलापूरच्या वतीने पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला.
आज दुपारी तीनच्या सुमारास एक महिला आपल्या दोन लहान मुलांसह एका रिक्षातून येऊन धडक छत्रपती संभाजी महाराज तलावत आत्महत्या करण्यासाठी उडी मारली तेव्हा येथून आपला कामानिमित्त जाण्यासाठी निघालेले दिनेश अरुण जाधव यांनी प्रसंगावधान राखून तात्काळ त्या बुडत असलेल्या दोन्ही लहान मुलांना व त्या महिलेस बाहेर काढले व त्या तीन जिवांच्या जीव वाचला सदर बाजार पोलिस स्टेशनचे व विजापूर नाका पोलिस स्टेशनचे बीट मार्शल हजा होते. आत्महत्येपासून परावृत्त करण्यासाठी सदर बाजार पोलिस स्टेशनला येऊन गेले आहेत.
यावेळी संभाजी ब्रिगेडच्यावतीने या धाडसाबद्दल संभाजी ब्रिगेडचे शहराध्यक्ष श्याम कदम जिल्हाध्यक्ष संभाजी भोसले उपाध्यक्ष सीताराम बाबर राष्ट्रवादीचे मुसा अख्तर व पोलीस कर्मचारी यांच्या वतीने पुष्पगुच्छ देऊन गौरविण्यात आले.