आचरा/ प्रतिनिधी-
जिल्हा व्यापारी महासंघाच्या व्यापारी एकता मेळाव्यात आचरा व्यापारी संघटनेला जिल्हा व्यापारी महासंघातर्फे देण्यात येणारा या वर्षीचा कै. प्रतापराव केनवडेकर आदर्श व्यापारी संघटना ग्रामीण विभाग हा पुरस्कार देऊन आचरा व्यापारी संघटनेला सन्मानित करण्यात आले
यावेळी जिल्हा व्यापारी महासंघाचे अध्यक्ष प्रसाद पारकर, सचिव नितीन वाळके, कोषाध्यक्ष अरविंद नैवाळकर, कणकवली तालुका व्यापारी संघटना अध्यक्ष दिपक बेलवलकर, आचरा व्यापारी संघटनेचे अध्यक्ष अर्जुन बापर्डेकर, खजिनदार जयप्रकाश परुळेकर, मंगेश टेमकर, अनिल करंजे, मंदार सांबारी, माणिक राणे, पंकज आचरेकर, हेमंत गोवेकर, चंदू कदम यांसह महासंघाचे अन्य पदाधिकारी आदी मान्यवर उपस्थित होते.