बेडकिहाळ : हुक्केरी तालुक्यातील हडलगा येथील सरकारी प्राथमिक शाळेच्या सहशिक्षिका उषा गणपतराव मोहिते यांना जिल्हास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. यानिमित्त त्यांचा बेडकिहाळ येथे पाटील परिवार व मित्रमंडळाच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी सागर पाटील, मेघा पाटील, नानासाहेब पाटील, सविता पाटील, गजानन पाटील, नीलम पाटील, पंकज पाटील, सोनाली पाटील, मोहन जाधव, अरुणा जाधव, विनायक गायकवाड, मेघा गायकवाड, अंजना गायकवाड, पद्मावती गायकवाड, अजित पाटील, शुभांगी पाटील यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी सामाजिक कार्यकर्ते प्रमोदकुमार पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. स्वागत नानासाहेब पाटील यांनी केले. कार्यक्रमास युवराज मोहिते, अक्षय जाधव, वैभव जाधव, हर्षवधन पाटील, बबलू पाटील व इतर उपस्थित होते.
Previous Articleदलित समाजाच्या समस्या सोडविण्यासाठी प्रयत्नशील
Next Article पंजाबमध्ये 785 नवे कोरोना रुग्ण; 31 जणांचा मृत्यू
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.