ऑनलाईन टीम / मुंबई
शिवसेना आमदार आणि पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे आणि अभिनेत्री दिशा पटानी यांची अनेकदा चर्चा होताना दिसते. ते दोघंही चांगले मित्र आहेत. तसंच त्यांचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत, यावरून अनेकदा उलटसुलट चर्चा होत असते. आज संगमनेर येथे आयोजित मेधा महोत्सवात तरुण आमदारांशी संवाद साधला . दिग्दर्शक, संगीतकार अवधूत गुप्ते यांनी ही मुलाखत घेतली. या कार्यक्रमात आदित्य ठाकरे यांना अप्रत्यक्षपणे दिशा पटानीसंबंधी प्रश्न विचारण्यात आल्यानंतर त्यांनी तुमची दिशा चुकली आहे ,असं मिश्कील उत्तर दिलं.
अवधूत गुप्ते यांनी आदित्य ठाकरे यांना लग्नाचा प्रश्न विचारत कोड्यात टाकण्याचा प्रयत्न केला. रश्मी वहिनींनी किती वर्ष जबाबदारी घ्यायची ? असं विचारलं असता आदित्य ठाकरे यांनी आमदार म्हणून माझी जबाबदारी आईंने मुख्यमंत्र्यांवर सोपवली आहे असं उत्तर दिलं. यावर अवधून गुप्ते यांनी पण आम्हाला बातम्यांमध्ये काहीतरी दिसत असतं…आपका उत्तर हमको पटनी चाहिये ? म्हणत अप्रत्यक्षपणे दिशा पटानीचा उल्लेख केला.
यावर आदित्य ठाकरे यांनी तुमची दिशा चुकली आहे असं मिश्कील उत्तर दिलं. “आईने आधीच जबाबदारी सोडली आहे. कारण आई मला नेहमी राजकारणात जाऊ नको असं सांगायची. तुझे वडील, आजोबा राजकारणात आहेत. जसं पेपरमध्ये चांगलंही लिहिलं जातं तसं वाईटही. तिने मला आमदार होण्याआधी विचारलं का ? मी लढू शकतो असं विचारलं का ? असंही विचारलं होतं. त्यामुळे पुढचं काही ठरलं नसून आई सगळं ठरवणार आहे.” असं यावेळी आदित्य ठाकरे यांनी सांगितलं.
संगमनेर येथे आयोजित मेधा महोत्सवात धीरज देशमुख, आदिती तटकरे, आदित्य ठाकरे, रोहीत पवार, झिशान सिद्दीकी, ऋतुराज पाटील हे सर्व तरुण आमदार या कार्यक्रमात सहभागी झाले होते. यावेळी सर्व आमदारांनी दिलखुलास चर्चा करत अनेक प्रश्नांची उत्तरं दिली.