ऑनलाईन टीम / मुंबई :
महाराष्ट्र राज्याचे पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांचा आज जन्मदिवस आहे. आदित्य ठाकरेंवर महाराष्ट्रातून शुभेच्छांचा वर्षाव सुरू आहे. यातच आदित्य ठाकरे यांनी आजच्या खास दिवशी कौतुकास्पद गोष्ट केली आहे. त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. आदित्य ठाकरे यांनी आपल्या वाढदिवसा दिवशी जन्मत:च हृदयात तीन ब्लॉक असलेल्या सहा दिवसांच्या बाळाला मदतीचा हात दिला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, नवी मुंबईतील एका सहा दिवसांच्या बाळाच्या हृदयात तीन ब्लॉक आढळून आले. त्यामुळे त्यांचे कुटुंब अस्वस्थ होते. या बाबतची माहिती पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांना कळल्यावर त्यांनी लगेचच त्यांना 1 लाख रुपयांची मदत केली.
नवी मुंबईतील घणसोली राहणाऱ्या अब्दुल अन्सारी यांच्या घरी काही दिवसांपूर्वी जन्म घेतला. त्यामुळे संपूर्ण कुटुंब आनंदात होते. मात्र या बाळाच्या हृदयात जन्मापासूनच तीन ब्लॉकेज असल्याचे डॉक्टरांनी सांगितल्यावर कुटुंबावर आभाळ कोसळले. त्यानंतर बाळाला नेरुळच्या मंगल प्रभू रुग्णालयात पाठवण्यात आलं. त्याच्या प्रकृतीत काही सुधारणा न झाल्याने अब्दुल आपल्या मुलाला मुलुंडमधील फोर्टिस रुग्णालयात घेऊन गेले. त्यानंतर अब्दुल यांनी सर्वांकडे मदत मागितली. त्यांना मदतीची गरज आहे हे आदित्य ठाकरे यांना कळल्यावर आदित्य ठाकरे यांनी कार्यकर्त्यांच्या माध्यमातून एक लाख रुपयांची मदत अब्दुल यांना सुपूर्त केली तसेच हॉस्पिटलचा पूर्ण खर्च उचलण्याची तयारी देखील दाखवली.
दरम्यान, सध्या बळावर उपचार सुरू असून, बलाच्या पित्यानी आदित्य ठाकरे यांचे मनापासून आभार मानले आहेत.