ऑनलाईन टीम / पुणे :
पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय आणि शिर्डी देवस्थानचे विश्वस्त राहुल कनाल यांच्या मुंबईतील घरावर आयकर विभागाने आज सकाळी छापेमारी केली. कनाल यांच्या घरी छापासत्र सुरू असून, घराबाहेर केंद्रीय राखीव दलाच्या तुकडय़ा तैनात आहेत.
राहुल कनाल हे युवासेनेचे पदाधिकारीही आहेत. आज सकाळीच आयकर विभागाचे एक पथक कनाल यांच्या वांदे येथील नाईन अल्मेडा इमारतीतील कनाल यांच्या घरी दाखल झाले. त्यांनी झाडाझडती सुरू केली आहे. कनाल यांच्या इमारतीखाली सुरक्षा दलाच्या अधिकाऱ्यांचा बंदोबस्त ठेवला आहे. ही कारवाई कोणत्या प्रकरणाशी संबंधित आहे, हे अद्याप समोर आले नाही.
दररम्यान, शिवसेना नेते संजय राऊत यांची आज दुपारी पत्रकार परिषद होणार आहे. या पत्रकार परिषदेत ते केंद्रीय यंत्रणांचा भ्रष्टाचार उघड करणार आहेत. तत्पूर्वीच आज सकाळी आयकर विभागाने कनाल यांच्या घरी छापेमारी केल्याने खळबळ उडाली आहे.