कणकवली / वार्ताहर-
सिंधुदुर्ग दौऱ्यावर आलेले राज्याचे पर्यटन व पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे हे सिंधुदुर्गातून रत्नागिरीच्या दिशेने जात असताना त्यांच्या ताफ्यातील दोन – तीन वाहनांचा अपघात घडला. ही घटना खारेपाटण येथील चेकपोस्टनजीक मंगळवारी सकाळी ११.३० वा. सुमारास घडली. ठाकरे यांच्या वाहनाच्या पाठी असलेल्या वाहनांपैकी एका वाहनाच्या चालकाने अचानक ब्रेक मारला. परिणामी दोन – तीन वाहने परस्परांना धडकली. यात दोन पोलिसांची वाहने होती. अपघातात कुणीही जखमी झाले नसले तरी वाहनांचे नुकसान झाले.