नवी दिल्ली
आदित्य बिर्ला कॅपिटलच्या बोर्डाने आपली सहकारी कंपनी आदित्य बिर्ला सन लाइफ एएमसीचा आयपीओ सादर करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. सदरचा आयपीओ भांडवली बाजारात दाखल झाल्यानंतर ही सुचीबद्ध होणारी चौथी कंपनी असणार आहे. कंपनीच्या बोर्डाने 28 लाख समभागांना ऑफर फॉर सेलअंतर्गत विक्री करण्यासही मंजुरी दिली आहे. या सर्व समभागांची फेस व्हॅल्यु 5 रुपये ठेवण्यात आली आहे. या कंपनीतील दोन्ही भागीदारांनी या आयपीओत एकूण 3.6 कोटी समभाग विक्रीची योजना बनवली आहे.