बेळगाव/ प्रतिनिधी
आदित्य मिल्कची शाखा ग्लोब टॉकिजच्या मागे असणाऱया लष्करी वसाहतीमध्ये सुरू करण्यात आली आहे. सदर जागा लष्कराची असून, लष्कराने आदित्य मिल्कला शाखा सुरू करण्यास परवानगी दिली आहे. घरोघरी दूध, दही, तूप यांची नितांत गरज भासते. मात्र कोरोना काळात त्याची खरेदी करण्यासाठी महिलांनी किंवा अन्य कोणी शक्मयतो बाहेर जाऊ नये, या हेतुने मराठा लाईट इन्फंट्रीने ही शाखा सुरू करण्यास मान्यता दिली आहे.
या शाखेचे उद्घाटन मंगळवारी सकाळी इन्फंट्रीचे डेप्युटी कमांडंट कर्नल जावेद यांच्या उपस्थितीत करण्यात आले. वसाहतीतील महिला तापसी शील, शिल्पा जवेजर, जयश्री पाटील यानी फीत कापून शाखेचे उद्घाटन केले. महिला सबलिकरण होणे आवश्यक असल्याने ते केवळ चर्चेत न ठेवता अमलात सुद्धा यावे या हेतुने कर्नल जावेद यांनी या शाखेचे उद्घाटन करण्याचा मान महिलांना दिला. याप्रसंगी आदित्य मिल्कचे बेळगाव शाखा प्रमुख यल्लाप्पा गुरव, मार्केटींग मॅनेजर चंद्रकांत साळुंखे, स्टेशन हेडक्वॉर्टरचे एम. एस. चव्हाण उपस्थित होते..