सातारा शहर पोलिसांचा विनाकारण फिरणारे, दुकानांवर कारवाई
प्रतिनिधी / सातारा
सातारा शहर व परिसरात जिल्हाधिकाऱयांच्या आदेशाचे उल्लंघन केल्या प्रकरणी जिह्यातील 20 जणांवर विविध पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, सातारा येथील रविवार पेठेमध्ये तेथीलच तोफिक रशिद पठाण (वय 33) याने लकी जनरल स्टोअर्स हे दुकान सुरु ठेवल्याने त्यांच्यावर तक्रार पोलीस कॉन्स्टेबल अभय अशोक साबळे यांनी सातारा शहर पोलीस ठाण्यात दाखल केली.
बॉम्बे रेस्टॉरंट चौकात दिलीप किसन निकम (वय 59, रा. त्रिमूर्ती कॉलनी, गोडोली) हे विनाकारण दुचाकी चालवत फिरत असताना आढळून आल्याची तक्रार पोलीस नाईक अमृत अशोक वाघ (वय 30) यांनी सातारा शहर पोलीस ठाण्यात दाखल केली आहे. कमानी हौद परिसरात सचिन प्रल्हाद सुपेकर (वय 42) , निलेश अशोक चक्के (वय 35), संतोष शिवाजी झनकर (वय 37) रा. गुरुवार पेठ, सातारा), किशोर कुंडलिक पालसोडे (वय 45) रा. मंगळवार पेठ, सातारा हे क्सार्वजनिक रस्त्यावर विना मास्क फिरताना आढळून आले. पोलीस हवालदार सत्यवान बसवंत यांनी त्यांच्या विरोधात तक्रार दिली आहे.
कमानी हौद परिसरामध्ये रमेश अशोक देशमुख (वय 40), वीर हरुम सय्यद (वय 50) दोघेही रा. गुरुवार पेठ, सातारा यांनी अनुक्रमे मनीषा कांडप मशीन आणि अजिंक्य इंटरप्राईजेस मिरची कांडप यंत्र व पिठाची गिरण सुरू ठेवून जिल्हाधिकारी यांच्या आदेशाचे उल्लंघन केल्याची तक्रार पोलीस शिपाई सोनाली भोसले यांनी दिली आहे. पंताचा गोट येथे सुरज बाजीराव जाधव, महेंद्र दिनकर जाधव, गोपी नंदकुमार धनवडे, प्रथमेश हरीविजय बाबर सर्व रा. पंताचा गोट सातारा हे विनामास्क कट्टयावर बसलेले आढळून आले. त्यांच्यावर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सातारा- देगाव मार्गावर अमरलक्ष्मी स्टॉप कोडोली येथे तेथीलच सुरज सर्जेराव गायकवाड, किरण संजय शर्मा (रा. निकम कॉलनी, चंदन नगर, कोडोली, ओम सुरेश ठाकूर (रा. शिवराज पेट्रोल पंप परिसर, सातारा यांनी टेक प्रेशिजन इंजीनियरिंग ही कंपनी सुरू ठेवल्याने तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रविवार पेठेत गौरव मधुकर कदम (रा. गुरुवार पेठ, सातारा) याने जिल्हाधिकारी यांच्या आदेशाचे उल्लंघन केल्याची तक्रार सातारा शहर पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.