जिल्हाधिकाऱयांकडे निवेदनाद्वारे मागणी
प्रतिनिधी /बेळगाव
आधारकार्डसाठी बेळगाव वनमधून सर्वसामान्य जनतेकडून अधिक रक्कम आकारली जात आहे. त्यामुळे सर्वसामान्य जनता भरडली जात असून संबंधित कर्मचाऱयांना आणि बेळगाव वन चालविणाऱया चालकांना तातडीने समज द्यावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते मेघन लंगरकांडे यांनी जिल्हाधिकाऱयांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
तहसीलदार कार्यालयातील बेळगाव वनमध्ये आधारकार्ड काढण्यासाठी 200 रुपये मागणी करण्यात आली. त्यावेळी मी ती रक्कम देण्यास विरोध केला. त्यामुळे 150 रुपये रक्कम द्या, असे सांगण्यात आले. त्यामुळे मी ती रक्कम दिली. पण अशा प्रकारे पैसे घेणे योग्य आहे का? आधारकार्डसाठी किंवा दुरुस्तीसाठी किती रक्कम द्यायची, याचा खुलासा जिल्हा प्रशासनाने करावा, अशी मागणी त्यांनी निवेदनात केली आहे.
ग्रामीण भागातील सामान्य जनता विविध कामांसाठी आधारकार्ड काढून घेण्यासाठी धडपडत आहे. अधिक गरज असली तर अधिक रक्कम उकळली जात आहे. तेक्हा संबंधितांना सूचना करावी, असे या निवेदनात म्हटले आहे. यावेळी महिलाही मोठय़ा संख्येने उपस्थित होत्या.