शशिकला जोल्ले यांचे आरोग्यमंत्र्यांना निवेदन
बेंगळूर : आधारकार्ड नसलेल्या ज्येष्ठ नागरिकांना प्राधान्याने कोरोना प्रतिबंधक लस द्यावी, अशी विनंती महिला आणि बालकल्याणमंत्री शशिकला जोल्ले यांनी आरोग्यमंत्री डॉ. के. सुधाकर यांच्याकडे केली आहे. त्यामुळे लवकरच आधारकार्ड नसणाऱया ज्येष्ठ नागरिकांना लस देण्यात येईल, असे शशिकला जोल्ले यांनी सांगितले आहे.बेंगळूरमध्ये मंत्री डॉ. के. सुधाकर यांची भेट घेऊन त्यांनी निवेदन दिले. बालसंगोपन केंद्रांमध्ये काम करणाऱया कर्मचाऱयांनाही कोरोना योद्धा म्हणून मान्यता देऊन त्यांचेही तसेच उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांगांना प्राधान्याने लस द्यावी, अशी विनंती त्यांनी केली आहे. तसेच सर्वच जिल्हा आणि तालुका इस्पितळांमध्ये कोरोनाबाधित मुलांसाठी बेड राखून ठेवण्याची विनंती त्यांनी निवेदनात केली आहे. या विनंतीला आरोग्यमंत्री डॉ. सुधाकर यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.