पीएफ आयुक्त अश्विनकुमार यांचे आवाहन : वारसदारांची ऑनलाईन नोंदणी करण्याची सुविधा
प्रतिनिधी /पणजी
आधार क्रमांक आणि युएएन क्रमांक एकमेकांशी संलग्न करण्याचे आवाहन गोवा विभाग पी. एफ आयुक्त अश्विनकुमार गुप्ता यांनी केले आहे. यापूर्वी ती संलग्न करण्याची मुदत यापूर्वी व जून 2021 अशी होती. तीन नंतर 1 सप्टेंबर 2021 पर्यंत वाढवण्यात आली होती. पी. एफ. अर्थात भविष्य निर्वाह निधी अंतर्गत येणाऱया सर्व सदस्यांनी वारसदारांची (नॉमिनेशन) नोंदणी ऑनलाईन पद्धतीने युएएनमार्फत करावी. त्यामुळे सदस्यांचे निधन झाल्यास वारसदारांना रक्कमेचा दावा करणे सोपे होईल, असेही निदर्शनास आणले आहे.
पणजीतील पाटो यो असलेल्या गोवा विभागीय पी.एफ. कार्यालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी वरील माहिती देऊन पुढे सांगितले की, भारतीय स्वातंत्र्याच्या 75 व्या म्हणजेच अमृत महोत्सवी वर्षानिमित्ताने ही ऑनलाईन नॉमिनेशन सादर करण्याची प्रक्रिया सुरु झाली असून ती कशी करावी याची सविस्तर माहिती त्यांनी दिली.
गोव्यातील सुमारे 194019 कर्मचाऱयांचे आधार – युएएन क्रमांक संलग्न करण्याचे काम प्रलंबित असून सर्वांनी ते काम करण्याची गरज आहे. ते केले नाही तर पीएफची रक्कम पीएफ खात्यात जमा होण्यास अडचणी येऊ शकतात. वेळ लागू शकतो असे सुतोवाच त्यांनी केले. त्याशिवाय 11331 कर्मचाऱयांची आधार पडताळणी बाकी असून 29457 जणांचा मोबाईल क्रमांक युएएनशी संलग्न करण्याचे कामही प्रलंबित आहे. बँकेशी युएएन संलग्न करण्याचे सुमारे 30057 जणांचे काम बाकी आहे, अशी माहिती त्यांनी दिली. आधार क्रमांक व युएएन क्रमांक यांचा तपशील जुळत नसेल तर तो योग्य ती कागदपत्रे सादर करुन सुधारणा करावी असे आवाहन त्यांनी केले. पत्रकार परिषदेला पीएफ उपायुक्त योगेंद्रसिंग शेखावत व अतुल कोटकर उपस्थित होते.